Phone Tapping Case: रश्मी शुक्ला यांच्या तोंडी आदेशाने केले गेले फोन टॅपिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 11:35 AM2022-03-23T11:35:17+5:302022-03-23T11:36:31+5:30

पुणे : तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या तोंडी आदेशाने फोन टॅपिंग करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले. गुन्हेगारांच्या ...

Phone Tapping Case: Phone tapping was done by verbal order of Rashmi Shukla | Phone Tapping Case: रश्मी शुक्ला यांच्या तोंडी आदेशाने केले गेले फोन टॅपिंग

Phone Tapping Case: रश्मी शुक्ला यांच्या तोंडी आदेशाने केले गेले फोन टॅपिंग

Next

पुणे : तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या तोंडी आदेशाने फोन टॅपिंग करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले. गुन्हेगारांच्या नावाखाली राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणात गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलीस उपायुक्तांची पुणे पोलिसांनी सोमवारी चौकशी केली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सातजणांची चौकशी केली असून, त्यात पोलीस उपायुक्तांपासून ते तांत्रिक विश्लेषण विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

चौकशी करण्यात आलेले पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळात गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्या कालावधीत हा सर्व फोन टॅपिंगचा प्रकार झाल्यामुळे त्यांचीदेखील सोमवारी पुणे पोलिसांनी चौकशी केली. तसेच यापूर्वी तांत्रिक विश्लेषण विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व तेथे काम करणारे कर्मचारी यांचीदेखील चौकशी करण्यात आली असून, त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे करण्यात आलेल्या चौकशीत त्यांनी हे फोन टॅपिंग कोणाच्या सांगण्यावरून केले, त्यांना कोणाचे आदेश होते, कशाप्रकारे फोन टॅप केले, याबाबतची माहिती तपास अधिकारी घेत आहेत. या चौकशीत रश्मी शुक्ला यांनी तोंडी आदेश देऊन हे फोन टॅपिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख आणि मंत्री बच्चू कडू यांचे वेगवेगळ्या नावाने साठ दिवस फोन टॅपिंग केल्याच्या आरोपावरून रश्मी शुक्ला व इतरांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

फोन टॅपिंग प्रकरणाशी संबंधित असलेल्यांचे जबाब नोंदविण्यासाठी पुणे पोलिसांनी तयारी केली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हे जबाब नोंदविले जाणार आहेत. तसेच, या गुन्ह्यातील तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनादेखील जबाब नोंदविण्यासाठी लवकरच बोलविले जाण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. त्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Phone Tapping Case: Phone tapping was done by verbal order of Rashmi Shukla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.