Pune Crime: इन्शुरन्स रद्द करण्यासाठी फाेन केला अन् ३४ हजार रुपये गमावला

By भाग्यश्री गिलडा | Published: October 14, 2023 04:14 PM2023-10-14T16:14:07+5:302023-10-14T16:15:26+5:30

हा प्रकार २६ मे २०२३ रोजी दुपारी घडला. याबाबतचा गुन्हा नुकताच दाखल झाला आहे....

Phoned to cancel insurance and lost 34 thousand rupees pune crime news | Pune Crime: इन्शुरन्स रद्द करण्यासाठी फाेन केला अन् ३४ हजार रुपये गमावला

Pune Crime: इन्शुरन्स रद्द करण्यासाठी फाेन केला अन् ३४ हजार रुपये गमावला

पुणे : कस्टमर केअरमधून बोलताेय इन्शुरन्स रद्द करायचे आहे, असे सांगत सायबर चोरट्यांनी शिवणे परिसरात राहणाऱ्या तरुणाची फसवणूक केली. इन्शुरन्स रद्द करण्याच्या बहाण्याने तरुणांकडून ओटीपी घेऊन वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनद्वारे एकूण ३४ हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. हा प्रकार २६ मे २०२३ रोजी दुपारी घडला. याबाबतचा गुन्हा नुकताच दाखल झाला आहे.

याबाबत शिवणे परिसरात राहणाऱ्या संतोष रविराज तिवारी (वय २५) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तरुणाला इन्शुरन्स रद्द करायचा होता. त्यासाठी गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर शोधला. मिळालेल्या नंबरवर कॉल केल्यावर डीबीएस बँकेच्या कस्टमर केअरमधून बोलत आहे, असे सांगितले. तुमच्या क्रेडिट कार्डवरील इन्शुरन्स रद्द करायचा आहे, त्यासाठी एक ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल, असे सांगितले.

तरुणाने ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यावर त्याच्या मोबाइलचा संपूर्ण ॲक्सेस सायबर चोरट्यांना मिळाला. ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्याच्या बहाण्याने खासगी माहिती मिळविली. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाइल क्रमांक धारकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शबनम शेख करीत आहेत.

Web Title: Phoned to cancel insurance and lost 34 thousand rupees pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.