शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची महती सांगणारे प्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 05:39 PM2018-11-01T17:39:04+5:302018-11-01T17:41:14+5:30

पुण्यातील श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेकडून किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात अाले अाहे.

photo exibition of differnt forts at bal gandharv kaladalan | शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची महती सांगणारे प्रदर्शन

शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची महती सांगणारे प्रदर्शन

googlenewsNext

पुणे : बालगंधर्व कलादालनामध्ये शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची महती सांगणारे प्रदर्शन भरविण्यात अाले अाहे. श्री शिवदुर्ग संवर्धन या संस्थेकडून हे प्रदर्शन भरविण्यात अाले अाहे. या प्रदर्शनात विविध किल्ल्यांची छायाचित्रे तसेच माहिती देण्यात अाली अाहे. त्याचबराेबर दुर्मिळ वस्तू देखिल प्रदर्शनात मांडण्यात अाल्या अाहेत. 

    जास्तीत जास्त नागरिकांना किल्ल्यांची माहिती व्हावी तसेच दुर्गसंवर्धनाच्या कार्यात त्यांचाही हातभार लागावा या हेतूने हे प्रदर्शन भरविण्यात अाले अाहे. या प्रदर्शनात एका बाजूस किल्ल्यांची छायाचित्र अाणि त्यांची माहिती तर दुसऱ्या बाजूला संस्था दुर्गसंवर्धनाचे करत असलेल्या कामाची माहिती देण्यात अाली अाहे. रायगड, शिवनेरी, सिंहगड, ताेरणा, तुंग, रायरेश्वर,अशा विविध किल्ल्यांची विशिष्ट रचनेत ट्रेकर्सच्या माध्यमातून घेतलेली छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात अाली अाहेत. श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेचे दर्शन वाघ म्हणाले, गेल्या 10 वर्षांपासून अाम्ही हे प्रदर्शन भरवत अाहाेत. गड किल्ल्यांचं जसं एेतिहासिक महत्त्व अाहे तसं भाैगाेलिक महत्व देखिल अाहे. ते महत्व जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पाेहचावं यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात येत अाहे.


 
    4 नाेव्हेंबर पर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य खुले असणार अाहे. 

Web Title: photo exibition of differnt forts at bal gandharv kaladalan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.