तरुणीचे फोटो काढणारा अटकेत

By admin | Published: April 27, 2017 05:11 AM2017-04-27T05:11:49+5:302017-04-27T05:11:49+5:30

खराडी परिसरातल्या एका आयटी कंपनीमधील महिलांच्या प्रसाधनगृहात घुसून कर्मचारी तरुणीचे फोटो काढण्याचा धक्कादाय

A photojournalist arrested | तरुणीचे फोटो काढणारा अटकेत

तरुणीचे फोटो काढणारा अटकेत

Next

पुणे : खराडी परिसरातल्या एका आयटी कंपनीमधील महिलांच्या प्रसाधनगृहात घुसून कर्मचारी तरुणीचे फोटो काढण्याचा धक्कादायक प्रकार रात्री पावणे दहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी हाऊस किपिंगचे काम करणाऱ्या तरुणाला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे.
राजकमल राजबहाद्दूर यादव (वय 24, रा. थिटे वस्ती, खराडी मूळ बिहार) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी २६ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी परिसरात एका नावाजलेल्या बहुमजली इमारतीमधील आयटी कंपनीत तरुणी कंपनीमध्ये मनुष्यबळ विभागात काम करते. आरोपी हा मूळचा बिहारचा असून, गेल्या दोन वर्षांपासून तो हाऊस किपिंगचे काम करतो. फिर्यादी महिलेच्या कंपनीमध्ये कामगारांच्या पगारवाढीचे कामकाज सुरु आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री दहा वाजेपर्यंत इतर सहकाऱ्यांबरोबर कंपनीत थांबावे लागले होते. ती रात्री पावणे दहाच्या सुमारास पाचव्या मजल्यावरील प्रसाधनगृहामध्ये गेली. छतामधील मोकळ्या जागेतून कुणीतरी फोटो काढत असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. तिने बाहेर येत आवाज देऊन त्याला बाहेर येण्यास सांगितले. त्यावेळी राजकमल पसार होण्याच्या प्रयत्नात असताना तरुणीने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तिला ढकलून दिले. तरुणीने आरडाओरडा करत सुरक्षारक्षकाला आवाज दिला.
सुरक्षारक्षकाने त्याला पाठलाग करून पकडले. वरिष्ठांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. चंदननगर पोलिसांनी तत्काळ घटनस्थळी दाखल होत राजकमलला ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत.

Web Title: A photojournalist arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.