महिलेचे फोटो पतीसह नातेवाईकांमध्ये केले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 10:07 PM2018-09-28T22:07:31+5:302018-09-28T22:33:03+5:30
फोटो, व्हिडीओ पती तसेच नातेवाईकांच्या मोबाइलवर पाठविले. महिलेच्या संमतीशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून नातेवाईक, मित्र परिवारांमध्ये फोटो व्हायरल करून बदनामी केली.
पिंपरी : महिलेच्या पतीशी ओळख वाढवून वेळोवेळी घरी जाऊन विश्वास संपादन झाल्यानंतर महिलेचे मोबाइलमध्ये काढलेले फोटो, व्हिडीओ पतीला दाखवून बदनामी करणाऱ्या आरोपीविरोधात महिलेने फिर्याद नोंदवली आहे. वाकड पोलिसांकडे बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीशी ओळख वाढवून तिच्या नकळत काढलेले फोटो, व्हिडीओ पती तसेच नातेवाईकांच्या मोबाइलवर पाठविले. महिलेच्या संमतीशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून नातेवाईक, मित्र परिवारांमध्ये फोटो व्हायरल करून बदनामी केली. अशी महिलेने वाकड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार सुहास सूर्यवंशी (वय २६) या आरोपीविरोधात पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे.