लहानग्यांच्या फुलराणीने केली 62 वर्षे पुर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 07:16 PM2018-04-08T19:16:50+5:302018-04-08T19:18:56+5:30
लहानग्यांच्या चेहऱ्यावर अानंद फुलविणाऱ्या पुण्यातील पेशवे उद्यानातील फुलराणी या ट्रेनने अाज 62 वर्षे पुर्ण केली. त्यानिमित्त या ट्रेनला फुलांनी तसेच फुग्यांनी सजविण्यात अाले हाेते.
पुणे : लहानग्यांना अानंदाची सफर घडविणारी, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी अशी पुण्यातील पेशवे उद्यानातील फुलराणीने अाज 62 वर्षे पुर्ण केली. 8 एप्रिल 1956 साली सुरु झालेली ही टाॅयट्रेन अनेकांच्या बालपणाची साक्षीदार अाहे. मधल्या काळात ही ट्रेन बंद पडली हाेती. परंतु लाेकाग्रहास्तव ती पुन्हा सुरु करण्यात अाली. लहानग्यांच्या कवितेतील अागीनगाडी त्यांना प्रत्यक्षात सफर घडवत अाहे.
पेशवे उद्यानात असलेल्या फुलराणीला सुरु हाेऊन अाज 62 वर्षे पुर्ण झाली. यानिमित्त या ट्रेनला फुलांनी तसेच फुग्यांनी सजविण्यात अाले हाेते. 1956 पासून ही ट्रेन या उद्यानात असल्याने अनेकांच्या मनात ती पक्की काेरली गेलेली अाहे. रविवार अाणि त्यात फुलराणीचा वाढदिवस असा याेग जुळून अाल्याने सकाळ पासूनच पालकांनी त्यांच्या चिमुकल्यांना घेऊन येथे गर्दी केली हाेती. फुलराणीच्या स्टेशनवर अाल्यावर अापण खराेखरच्या रेल्वे स्टेशनला अालाेय की काय असेच वाटत राहते. झाडांनी अच्छादलेल्या परिसरामधून ही फुलराणी धावताना चिमुकले वेगळ्याच दुनियेत हरवून गेले हाेते. पालक या ट्रेनमधून अापल्या मुलांसाेबत सेल्फी काढत अापल्या मुलांच्या चेहऱ्यावरील अानंद कॅमेरात बंदिस्त करत हाेते. अापल्या बालपणी अाम्ही सुद्धा या ट्रेनमध्ये बसून खूप धमाल केली हाेती असे पालक अापल्या पाल्याला अावर्जुन सांगत हाेते. पुन्हा आपल्या लहानपणीची अाठवण जगताना लहानग्यांबराेबरच पालकांच्या चेहऱ्यावरील अानंद अाेसंडून वाहत हाेता.
गेल्या आठ वर्षांपासून ही फुलराणी चालविणारे अर्जुन राऊत म्हणाले, माझ्या जन्माच्या अाधीपासून ही फुलराणी पेशवे उद्यानात धावत अाहे. मधला काही ही फुलराणी बंद हाेती, नंतर पुन्हा सुरु झाली. गेल्या अाठ वर्षात अनेक चांगले अनुभव अाले. लहानग्यांच्या चेहऱ्यावरील अानंद पाहून अापण करत असलेल्या कामाचे समाधान वाटते. शनिवार-रविवार या फुलराणीत बसायला गर्दी असते. गर्दी नसल्यावर मात्र निराश वाटतं. लहानग्यांना या फुलराणीची सफर घडविण्यातच खरा अानंद अाहे.