पुण्यातील धक्कादायक प्रकार! पैशांसाठी दिली शारीरिक संबंधांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 01:43 PM2022-02-09T13:43:44+5:302022-02-09T13:44:12+5:30

फिर्यादी यांच्या नातेवाइकांना व घरच्यांना याबाबत कळवून त्यांची जनमानसामधील प्रतिमा मलीन करून बदनामी केली

Physical intimidation video viral threat for money in pune | पुण्यातील धक्कादायक प्रकार! पैशांसाठी दिली शारीरिक संबंधांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

पुण्यातील धक्कादायक प्रकार! पैशांसाठी दिली शारीरिक संबंधांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

Next

पुणे : महिलेबरोबर असलेल्या शारीरिक संबंधांचे व्हिडीओ व्हायरल करून महिलेच्या नातेवाईक, घरच्यांना कळवून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगरपोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. धनंजय वंदनकुमार माने (वय २९, रा. यशवंतनगर, खराडी, मूळ रा. हसनापूर रोड, माने वस्ती, मु़ पो़ दुर्गापूर, ता. राहता, जि. अहमदनगर) असे त्याचे नाव आहे.

याप्रकरणी वाघोली येथील एका २५ वर्षांच्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार प्रवरानगर येथील विखे पाटील हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज तसेच चंदनगर, वडगाव शेरी येथील लॉजवर २०१६ ते २०१७ तसेच जुलै २०१९ ते ३ डिसेंबर २०२१ दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे प्रवरानगरमध्ये असताना त्यांची ओळख झाली होती. त्यादरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध आला. त्याचा धनंजय माने याने व्हिडीओ काढला होता. त्यानंतर फिर्यादी या पुण्यात राहण्यास आल्या असताना हा व्हिडीओ व्हायरल करीन, फिर्यादी यांचे करिअर बरबाद करीन, फिर्यादी यांनी त्यांच्याशी केलेल्या शारीरिक संबंधांबाबत त्यांच्या भावास अथवा घरच्यांना सांगून बदनामी करेन, अशा विविध प्रकारे वेळोवेळी धमक्या दिल्या. भीती घालून फिर्यादी यांच्याकडे पैशांची मागणी केली. बळजबरीने पुण्यातील विविध ठिकाणी भेटायला बोलावले. त्यांच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतरही फिर्यादी यांच्या नातेवाइकांना व घरच्यांना याबाबत कळवून त्यांची जनमानसामधील प्रतिमा मलीन करून बदनामी केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून धनंजय माने याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.

Web Title: Physical intimidation video viral threat for money in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.