नियमित योग केल्याने शारीरिक, मानसिक संतुलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:10 AM2021-06-25T04:10:16+5:302021-06-25T04:10:16+5:30
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सुवर्णा देवळाणकर यांनी योगासनाचे महत्त्व विशद केले. त्या म्हणाल्या, ‘सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात ...
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सुवर्णा देवळाणकर यांनी योगासनाचे महत्त्व विशद केले. त्या म्हणाल्या, ‘सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग हा अत्यंत उपयुक्त आहे. तसेच, या महामारीच्या काळात आलेला मानसिक ताण-तणाव दूर होऊन मानसिक आरोग्य जपण्यास देखील योगासने अत्यंत उपयुक्त असून ते कमी जागेत करू शकतो. नियमितपणे योगासने केल्यामुळे सामर्थ्य, संतुलन, लवचिकता सुधारते तसेच शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम व निरोगी ठेवते.”
त्यानंतर कार्यक्रमात शारीरिक शिक्षण संचालिका एकता जाधव व महाविद्यालयीन खेळाडू सई कचरे, शीतल महाडिक व ॠतुजा कवडे यांनी योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले. हा कार्यक्रम प्रभारी प्राचार्य डॉ. जया राजगोपालन यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्य डाॅ. शालिनी अय्यर यांच्या सहकार्याने आयोजित केला गेला. या वेळी जिजामाता पुरस्कार विजेत्या गुरबन्स कौर, रजिस्टार गौरी म्हाळगी, एनएसएस विभागाच्या डाॅ. संध्या पंडित व मंजिता कुलकर्णी, विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी ऑनलाईन पध्दतीने सहभागी झाले होते.