आयुर्वेद सर्वमान्य होण्यासाठी वैद्याने पुढाकार घ्यावा : डॉ. सतीश डुंबरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:10 AM2021-07-30T04:10:27+5:302021-07-30T04:10:27+5:30
पुणे : ‘बदलत्या जीवनशैलीमुळे, तसेच सौंदर्यप्रसाधनांच्या अतिवापरामुळे त्वचारोगाचे रुग्ण वाढत आहेत. कोणताही रोग मुळापासून दूर करणे महत्त्वाचे असते. मानवी ...
पुणे : ‘बदलत्या जीवनशैलीमुळे, तसेच सौंदर्यप्रसाधनांच्या अतिवापरामुळे त्वचारोगाचे रुग्ण वाढत आहेत. कोणताही रोग मुळापासून दूर करणे महत्त्वाचे असते. मानवी शरीराला व्याधीमुक्त करण्याची शक्ती आयुर्वेदात आहे. त्यामुळे वैद्याने आयुर्वेद सर्वमान्य होण्यासाठी पुढाकार घेऊन काम करावे’, असे प्रतिपादन अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश डुंबरे यांनी केले.
आरोग्यवर्धिनी चिकित्सालयातर्फे कोरोनाकाळात काम करणाऱ्या परिचारकांचा सन्मान करण्यात आला. नवी पेठेतील पत्रकार भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी डॉ. गिरीश दाते, वैद्य सुकुमार सरदेशमुख, डॉ. भाग्येश कुलकर्णी, वैद्य स्नेहल पाटणकर उपस्थित होते.
कोरोनातील रुग्णसेवेबद्दल डॉ. गायत्री संत, डॉ. रोशन चव्हाण, शेखर बर्गे, अक्षय बर्गे, श्रद्धा काटकर, विराज शेख, अदिती प्रधान, अरुण कोळसे यांना कोरोनायोद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी वैद्य हरीश पाटणकर यांच्या कायायुर्वेदचे उद्घाटन झाले. डॉ सिद्धी गुंफेकर, डॉ. प्रियंका डावर यांनी सूत्रसंचालन केले. वैद्य स्नेहल पाटणकर यांनी आभार मानले.