डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी कचऱ्याचा ढीग उचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:08 AM2021-06-17T04:08:59+5:302021-06-17T04:08:59+5:30
मंचर: शहरात जागोजागी पडलेला कचरा त्वरित उचलावा. तसेच डेंग्यूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित राबवण्यासंदर्भात मंचर शहर भाजपच्या वतीने मंचर ग्रामपंचायतीला ...
मंचर: शहरात जागोजागी पडलेला कचरा त्वरित उचलावा. तसेच डेंग्यूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित राबवण्यासंदर्भात मंचर शहर भाजपच्या वतीने मंचर ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले.
मंचरमध्ये गेल्या काही दिवसांत डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने कोरोनासोबतच डेंग्यूसारख्या साथ रोगांचाही सामना नागरिकांना करावा लागत आहे. याबाबत मंचर शहर भाजपाच्या वतीने मंचर ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिले आहे.
कोरोना रुग्णांची संख्या मंचरमध्ये घटली असली, तरी डेंग्यू हा साथ रोग शहरात डोकेवर काढू पहात आहे. नुकतेच डेंग्यूचे ६ रुग्ण गावात आढळून आले आहेत. मंचर गावठाणात बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडले आहेत. तसेच नागरिक मोकळ्या व पडीक जागेत कचरा टाकत आहे. यामुळे अधेमधे होणाऱ्या पावसामुळे सदर कचऱ्याचे ढीग हे डासांचे उत्पत्तीस्थान ठरत आहे. यामुळे मंचरच्या नागरिकांचे कोरोना सोबतच डेंग्यू, मलेरिया यासारख्या साथ रोगांमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी मंचर ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ डेंग्यूचे प्रतिबंधात्मक उपाय करावे. तसेच जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढीग उचलून शहरामध्ये धूर फवारणी करावी. सदर साथ रोगाबाबत तालुक्याच्या आरोग्य विभागाला कळवून योग्य त्या उपयोजना कराव्यात तसेच जनतेत या साथ रोगाबाबत जनजागृती करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी भाजपाचे संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले, मंचर शहराध्यक्ष नवनाथ थोरात, युवा उपाध्यक्ष सुशांत थोरात, सोमनाथ फल्ले, गणेश बाणखेले, रोहन खानदेशे, फैज जमादार, विकास बाणखेले उपस्थित होते.