ओतूर ते नारायणगाव रस्त्यावर पिकअप-कारचा अपघात, २० जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 16:48 IST2025-02-07T16:48:09+5:302025-02-07T16:48:24+5:30
२० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

ओतूर ते नारायणगाव रस्त्यावर पिकअप-कारचा अपघात, २० जखमी
ओतूर : जुन्नर तालुक्यातील ओतूर गावच्या हद्दीत शुक्रवारी (दि. ७) सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान ओतूर ते नारायणगाव रस्त्यावर धोलवड रोड येथे पिकअप-कारचा अपघात झाला. यामध्ये २० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
अपघाताची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ओतूर बाजूकडून नारायणगाव बाजूकडे जाणारी पिकअप (क्र. एम.एच. १४ जी.यू. १५६६) व नारायणगाव बाजूकडून ओतूर बाजूकडे येणारी कार (क्र. एम.एच. १२ जी.एफ. ०८६०) यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. पिकअपमध्ये आळू येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व पालक शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाकरिता खोडद (ता. जुन्नर) येथे जात असताना हा अपघात झाला असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
पिकअप चालक अरविंद बबनराव हांडे (वय ५५, रा. पिंपळगाव जोगा, ता. जुन्नर), ईश्वरी मोहन बोकड (वय ८), यश पंडित घाडगे (वय ७), सार्थक प्रकाश साळवे (वय ८), ऋषी राजेंद्र भले (वय ८), कुणाल भगवान लोहकरे (वय ७), सर्वेश पोपट बोकड (वय ७), श्रेया भाविक धोत्रे ( वय ८), शिवांश सुधीर सस्ते ( वय ८), आदित्य संपत तळपे (वय ९), मीना भगवान लोकरे (वय २३), प्रकाश कचरू साळवे (वय ३९), विठ्ठल रखमा गाडगे (वय ७), कल्पना भीमराव धोत्रे (वय ५०, सर्व रा. अळू, ता. जुन्नर), सुधीर जगन सस्ते (वय ४२, रा. पिंपळगाव जोगा) तसेच कारचालक हर्ष दिनेश शहा (वय २४, रा. आदिनाथ सोसायटी, पुणे, ता. हवेली, जि. पुणे), ऋग्वेद युवराज पुसदकर (वय २२ रा. पुणे), हिमांशू किशोर पांडे (रा. नऱ्हे पुणे), सूरज संतोष मोरे (वय २६, रा. धनकवडी, पुणे), प्रतीक दुनगुले (पूर्ण नाव माहीत नाही. रा. पुणे) अशी जखमींची नावे आहेत. ओतूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलिस तपास करीत आहेत.