पळसदेव येथे सेवा रस्त्यावर दगडाचा ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:08 AM2021-06-17T04:08:53+5:302021-06-17T04:08:53+5:30
पळसदेव : पळसदेव (ता. इंदापूर) येथे पुणे -सोलापूर महामार्गाच्या सेवा रोडवर अज्ञात व्यक्तीने दगड टाकले आहेत, ...
पळसदेव : पळसदेव (ता. इंदापूर) येथे पुणे -सोलापूर महामार्गाच्या सेवा रोडवर अज्ञात व्यक्तीने दगड टाकले आहेत, त्यामुळे येथील पायी चालणारे, दुचाकीस्वार, चारचाकी वाहने यांचा रात्रीचा अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र, इतका मोठा ढीगही टोल प्रशासनाला दिसत नाही की दिसूनही ते केवळ टोल घेण्यात दंग आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे.
स्थानिक नागरिक व जे नागरिक या ठिकाणाहून रात्री प्रवास करतात त्यांना फार धोका असून एखादा मोठा अपघात घडल्यावरच किंवा कोणाचा जीव गेल्यावर हे सेवा रस्त्यावर पडलेले दगड धोंडे महामार्ग प्राधिकरण किंवा प्रशासन काढेल, असा जाब स्थानिक नागरिक विचारत आहेत.
पुणे - सोलापूर या महामार्गाच्या दोन्ही बाजूला पळसदेव गाव वसलेले आहे, त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यातच महामार्गाच्या सेवा रोडवर अज्ञात व्यक्तीने दगडाचा ढीग टाकला आहे, त्यामुळे त्यापासून नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. महामार्ग प्राधिकरण ते लवकरात लवकर दूर करावे अशी मागणी करण्यात आली आहे.परंतु वारंवार मागणी करूनही टोल प्रशासन यावर दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. तरी टोल प्राधिकरणानी रस्त्यावर असणारे दगडे दूर करावे व रस्ता सुरळीत करावा ही मागणी पळसदेव व परिसरातील नागरिक करत आहेत.
--
फोटो क्रमाकं : १६पळसदेसव रस्त्यावर ढीग