बैलांच्या झुंजीचा पिंपळगावला थरार

By admin | Published: August 11, 2016 03:01 AM2016-08-11T03:01:04+5:302016-08-11T03:01:04+5:30

येथे नागपंचमीनिमित्त प्रेक्षकांनी बैलांच्या चितपट झुंजीचा थरार अनुभवला. गेल्या १०० वर्षांपासून बैलांच्या झुंजीची अनोखी परंपरा आहे.

Pimpalagaw Thunder | बैलांच्या झुंजीचा पिंपळगावला थरार

बैलांच्या झुंजीचा पिंपळगावला थरार

Next

केडगाव : पिंपळगाव (ता. दौंड) येथे नागपंचमीनिमित्त प्रेक्षकांनी बैलांच्या चितपट झुंजीचा थरार अनुभवला. गेल्या १०० वर्षांपासून बैलांच्या झुंजीची अनोखी परंपरा आहे. सायंकाळी ५ च्या सुमारास सिद्धेश्वर विद्यालयाच्या मैदानात झुंजीला सुरुवात झाली. सुरुवातीस लहान बैलांच्या झुंजी झाल्या. यानंतर मोठ्या बैलांच्या झुंजी रंगल्या. अंतिम
लढत काळुराम टिळे यांच्या सर्जा विरुद्ध सुरेश कापरे यांच्या पोपट बैलांमध्ये रंगली.
सुमारे १० मिनिटे एकमेकांशी झुंज खेळल्यानंतर लढत बरोबरीत सुटली. या वेळी सरपंच रमेश कापरे, भीमा पाटसचे संचालक चंद्रकांत नातूू, नारायण जगताप, सतीश थोरात, अर्जुन जगताप, दिगांबर कापरे उपस्थित होते.
पिंपळगावचे सरपंच रमेश कापरे म्हणाले, ‘‘सध्या यंत्रसामग्रीचे युग आहे.शेतीची मशागत बैलांऐवजी ट्रॅक्टरने होते. त्यामुळे बैलांची संख्या कमी होत आहे. केवळ झुंजीसाठी शौक म्हणून शेतकरी बैल वर्षभर सांभाळू शकत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस झुंजीसाठी येणाऱ्या बैलांची संख्या घटली आहे. (वार्ताहर)

Web Title: Pimpalagaw Thunder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.