पिंपळे निलखला १३ वाहनांची तोडफोड

By admin | Published: May 8, 2017 03:04 AM2017-05-08T03:04:09+5:302017-05-08T03:04:09+5:30

पिंपळे निलख येथील पंचशीलनगर, गणेशनगर भागात रविवारी पहाटे अज्ञात व्यक्तींकडून १३ वाहनांची तोडफोड करण्यात

Pimpale Nikhla, 13 vehicles collapsed | पिंपळे निलखला १३ वाहनांची तोडफोड

पिंपळे निलखला १३ वाहनांची तोडफोड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपळे निलख येथील पंचशीलनगर, गणेशनगर भागात रविवारी पहाटे अज्ञात व्यक्तींकडून १३ वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यामध्ये ८ चारचाकी वाहने, ५ रिक्षा आणि दुचाकी वाहनांचा समावेश आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी दहशत माजविण्याच्या घटना सुरू झाल्या आणि निवडणुकीनंतर अशा घटनांचे सत्र सुरूच राहिले आहे. या दहशत माजविण्याच्या घटनांना आळा घालण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
शहराच्या विविध भागांत वर्षभरात वाहन तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. थेरगाव, भोसरी, आनंदनगर, चिंचवड, नेहरूनगर, सांगवी,काळेवाडी, वाकड आणि प्राधिकरण या भागात अशा घटना एक ते दोन वेळा घडल्या आहेत. आता पिंपळे निलख परिसरही अशा घटनांना अपवाद राहिलेला नाही, याचा प्रत्यय रविवारी पहाटे नागरिकांना आला. दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड करणे, जाळपोळ करणे अशा गुन्ह्यात सापडलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केल्या आहेत. काहींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नेहरूनगर, मिलिंदनगर भागातील गुंडांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. अशा घटनांना आळा घालण्याच्या उपाययोजना पोलिसांनी केल्या. कठोर कारवाईचे पाऊल उचलले, तरी या घटनांना आळा बसत नाही. गुंडांना पोलिसांचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे पुन: पुन्हा अशा घटना घडत आहेत.
भोसरीतील चक्रपाणी वसाहतीमध्ये दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी रस्त्यात उभी असलेली दुचाकी पेटवून देण्याचा प्रकार महापालिका निवडणुकीपूर्वी डिसेंबर २०१६ मध्ये घडला होता. शेजाऱ्यांशी झालेल्या किरकोळ वादातून काळेवाडीत अल्पवयीन मुलांनी रात्री बाराच्या सुमारास एका मोटारीची तोडफोड केली. बौद्धनगर, भाटनगरमध्ये दोन गटांत झालेल्या वर्चस्ववादातून वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.
७ जुलैला घडलेल्या या प्रकरणातील सात आरोपींना अटक केली होती. त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. आनंदनगरमध्ये तडीपार गुंड अविनाश पवार व त्याच्या साथीदारांनी सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हत्यारे घेऊन वावरणाऱ्या गुंडांच्या टोळक्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले.
चिंचवडमध्ये २९ एप्रिलला सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या सहा दुचाकी खाक झाल्याची घटना उघडकीस आली.

आनंदनगरमध्येही घातला होता धूडगुस
आनंदनगरमध्ये २५ नोव्हेंबर २०१६ला दगडफेक आणि वाहनांच्या तोडफोडीची घटना घडली. दगडफेक करून दुचाकी आणि तीन चारचाकी वाहनांचे नुकसान केले. त्यानंतर २९ नोव्हेंबरला तडीपार गुुंड व त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली. जामिनावर सुटून आल्यानंतर आनंदनगरमध्ये गुंडांच्या टोळक्याने धुडगूस घातला. पुन्हा वाहनांची तोडफोड केली होती.

Web Title: Pimpale Nikhla, 13 vehicles collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.