पिंपळगावला कुल समर्थक जनसेवा पॅनलचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:11 AM2021-01-19T04:11:48+5:302021-01-19T04:11:48+5:30
एकूण १३ जागांसाठी २७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी आमदार राहुल कुल समर्थक दोन जागा बिनविरोध निवडून आल्या. ...
एकूण १३ जागांसाठी २७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी आमदार राहुल कुल समर्थक दोन जागा बिनविरोध निवडून आल्या.
जनसेवा पॅनेलचे विजयी उमेदवार सुप्रिया नातू, संगीता जाधव, शुभांगी पासलकर, अमित थोरात, शीतल मापारे, राजेंद्र दिवेकर, नितीन नातू, कविता कापरे, प्रियंका ताम्हाणे, रणजित कदम, तर विरोधी सिद्धेश्वर परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक नारायण जगताप, यांनी , कोमल जाधव यांनी बाजी मारली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात समर्थक सिद्धेश्वर परिवर्तन पॅनेल सात जागा लढविल्या त्यापैकी दोन जागांवर विजय संपादन करता आला. सिद्धेश्वर सहकार पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही त्यांचा दारुण पराभव झाला.
आमदार कुल समर्थक जनसेवा पॅनेलच्या प्रभाग ५ मधील मंगल नानासाहेब थोरात, बजरंग अनंता लडकत हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. लक्षवेधी लढतीमध्ये प्रभाग १ मध्ये खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष नारायण जगताप यांनी नितीन काकडे यांचा ९७ पराभव केला. या निवडणुकीत आमदार कुल गटाने बाजी मारल्याने समर्थकांनी एकच जल्लोष केला. साहिल नातू यांनी दीपक कापरे यांचा दहा मतांनी तर कविता कापरे यांनी मनीषा कापरे यांचा (१५) मतांनी पराभव केला. लक्षवेधी लढतीत शुभांगी सुनील पासलकर १०२ मतांनी तर राजेंद्र देवकर ५३ मतांनी विजयी झाले आहेत.
- पिंपळगाव (ता. दौंड) येथील ग्रामपंचायत जनसेवा पॅनेल बहुमत मिळाल्यानंतर जल्लोष करताना समर्थक.----------------------------------