Pimpare Murder Case: हरिश्चंद्र थोपटे खूनप्रकरणी महिलेसह नऊ संशयितांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 11:54 AM2023-07-22T11:54:58+5:302023-07-22T11:55:44+5:30
या खून प्रकरणात एका महिलेसह नऊ संशयितांना रात्रीतच ताब्यात घेतले...
नीरा (पुणे) : पुरंदर तालुक्यातील नीरा नजीक पिंपरे येथे कोयत्याचा वार करून एकाचा खून करण्यात आला होता. काल (शुक्रवारी) रात्री हा खून करण्यात आला होता. हरिश्चंद्र बजरंग थोपटे यांचा यामध्ये मृत्यू झाला होता. कोयत्याचा वार करून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या खून प्रकरणात एका महिलेसह नऊ संशयितांना रात्रीतच ताब्यात घेतले.
हरिश्चंद्र थोपटे हे नीरा येथे माथाडी कामगार म्हणून काम करीत होते. दरम्यान या प्रकरणी जेजुरीपोलिसांनी काल सुत्र हलवत रात्री लगेच ९ जणांना ताब्यात घेतलं आहे. जेजुरी पोलीस या बाबत तपास करत आहेत. भोर उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, जेजुरीचे पोलीस निरीक्षक सांडभोर आणि जेजुरी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करून संशयितांना घटनेनंतर अवघ्या तीन तासात जेरबंद केले आहे.
या घटनेबाबत पोलीस संशयितांची चौकशी करीत आहेत. हे संशयित पिंपरे, नीरा, सासवड, पाडेगाव परिसरातील युवक आहेत. तर काही युवक परराज्यातील असल्याची माहिती समोर येत आहे. तर यातील काही जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे सांगण्यात येत आहे.