पिंपरी-चिंचवडमध्ये सायकली पुन्हा लागल्या धावू

By admin | Published: September 27, 2016 04:26 AM2016-09-27T04:26:42+5:302016-09-27T04:26:42+5:30

सायकलींचे शहर अशी एके काळची पुण्याची ओळख काळाच्या ओघात पुसली गेली. चारचाकी, दुचाकींची संख्या इतकी वाढली, की सायकलचे दर्शन दुर्मिळ होत गेले.

In Pimpri-Chinchwad, the bikes will start again | पिंपरी-चिंचवडमध्ये सायकली पुन्हा लागल्या धावू

पिंपरी-चिंचवडमध्ये सायकली पुन्हा लागल्या धावू

Next

- संजय माने, पिंपरी

सायकलींचे शहर अशी एके काळची पुण्याची ओळख काळाच्या ओघात पुसली गेली. चारचाकी, दुचाकींची संख्या इतकी वाढली, की सायकलचे दर्शन दुर्मिळ होत गेले. व्यायाम, तसेच निसर्गभ्रमंतीची आवड असलेल्यांनी शारीरिक तंदुरुस्तीसाठी नित्यनियमाने सायकल चालविण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये सायकली दिसू लागल्या आहेत.
सायकलप्रेमींचे व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार होऊ लागले असून, सायकलिंग हा उत्तम व्यायाम असल्याचे मनोेमन पटलेल्यांच्या सायकली रोज सकाळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर धावू लागल्या आहेत. रोज सकाळी शुद्ध हवेत जॉगिंंगसाठी येणारे, तसेच तरण तलावात पोहणारे, निवांत ठिकाणी बसून योग करणाऱ्यांनी व्यायामाची आवड जपण्यासाठी सायकल वापरण्याचा संकल्प केला. रोज किमान दोन किलोमीटर तरी सायकल चालवायची, असा निश्चय त्यांनी केला. अगदी पाच वर्षांच्या बालकापासून ६० वर्षांच्या वृद्धांनी सायकलिंगला प्राधान्य दिले.
सुरुवातीला सात जणांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या उपक्रमास प्रतिसाद वाढत गेला. सकाळी शुद्ध हवेत निगडीतील दुर्गादेवी टेकडीवर फेरफटका मारण्यासाठी आल्यानंतर ओळख झालेल्या सात ते आठ जणांनी सायकल चालविण्याचा व्यायाम करायचे ठरवले. सायकलचा वापर व्यायाम तंदुरुस्तीसाठी उपयुक्त ठरणारा आहे; एवढेच नाही, तर सायकल वापराने पर्यावरण संतुलनास मदत होते. प्रदूषण नियंत्रणासाठी सायकलचा अधिकाधिक वापर हा उत्तम पर्याय ठरू शकतो. हे पटवून देण्यासाठी या सायकलप्रेमींच्या ग्रुपने पुढाकार घेतला आहे. सकाळी उठल्यानंतर दूध आणण्यासाठी अथवा अन्य किरकोळ कामांकरिता दुचाकीचा वापर केला जातोे. दुचाकीचा वापर टाळून सायकल वापरण्यास प्राधान्य दिले आहे.

सायकलप्रेमींचा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप
पिंपरी-चिंचवडमध्ये स्थापन झालेल्या ग्रुपने आतापर्यंत अष्टविनायक, तसेच लोहगड या ठिकाणी सायकल दौरे केले आहेत. महिन्यातून एकदा दूर अंतरावरचा सायकल दौरा काढल्यानंतर त्या मार्गावर येणाऱ्या शाळा, ग्रामपंचायत या ठिकाणी सायकलप्रेमींचा हा ग्रुप सायकल आणि पर्यावरणाचे महत्त्व पटवून देतो. पहाटे सहा ते नऊ या कालावधीत विविध वयोगटांतील सायकलस्वार आणि स्केटिंग करणारी मुले यांनीच स्पाइन रस्ता भरलेला दिसून येतो. दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ सुरू होण्यापूर्वी स्पाइन रस्ता हा जणूकाही सायकल आणि स्केटिंग ट्रॅक असल्याचे चित्र पहावयास मिळते.
अनोखा संकल्प
अधिकाधिक लोकांनी सायकल वापरास प्राधान्य द्यावे, यासाठी सायकलप्रेमींचा हा ग्रुप जोमाने काम करू लागला आहे. पिंपरी-चिंचवडमधील सुनील पाटील, सुनील ननावरे, संतोष गाडवे, राजू भापकर, बापू शिंदे, अभिजीत स्वामी, डॉ. नीलेश लोंढे, मोहन कर्पे यांनी सायकल वापराचा संकल्प करून सायकलप्रेमींची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे.

Web Title: In Pimpri-Chinchwad, the bikes will start again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.