सीईटीसाठी सोलापूरच्या विद्यार्थ्यांना पिंपरी-चिंचवड परीक्षा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:13 AM2021-09-22T04:13:44+5:302021-09-22T04:13:44+5:30
राज्यभरात राज्य सीईटी सेलमार्फत कोरोनामुळे सुमारे दोन महिने उशिराने ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षा प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर घेतली जात आहे. सीईटीसाठी सुमारे ...
राज्यभरात राज्य सीईटी सेलमार्फत कोरोनामुळे सुमारे दोन महिने उशिराने ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षा प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर घेतली जात आहे. सीईटीसाठी सुमारे ५ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, येत्या १ ऑक्टोबरपर्यंत परीक्षा घेतली जाणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, सर्व विद्यार्थ्यांना सीईटीसाठी जवळचे परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिले जाईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार यंदा १९८ परीक्षा केंद्रांऐवजी २२६ केंद्रांवर परीक्षा घेतली जात आहे.
विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी हॉलतिकीट डाऊनलोड केल्यानंतर सोलापूरमधील काही विद्यार्थ्यांना सोलापूर व पुण्याऐवजी पिंपरी-चिंचवड येथील परीक्षा केंद्र मिळाले आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा येत्या २८ सप्टेंबर रोजी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना लांबचा प्रवास करावा लागणार असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.