राहण्यायोग्य शहर स्पर्धेत पिंपरी चिंचवड देशात चौथे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:12 AM2021-03-05T04:12:02+5:302021-03-05T04:12:02+5:30
भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालयाच्या वतीने देशपातळीवर स्पर्धा घेण्यात आली होती. म्युनिसिपल परफॉरमेन्स इंडेक्स ठरविताना, कोणत्याही शहराचा ...
भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालयाच्या वतीने देशपातळीवर स्पर्धा घेण्यात आली होती. म्युनिसिपल परफॉरमेन्स इंडेक्स ठरविताना, कोणत्याही शहराचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या गव्हर्नन्स म्हणजेच प्रशासकीय कारभार असा निकष होता. २०१८ च्या सर्वेक्षणामध्ये शहराचा क्रमांक ६७ वा होता. त्यात सुधारणा झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहर देशात अव्वल ठरले आहे. तर राहण्यायोग्य शहरात देशातील पहिल्या वीस शहरात १६ वे स्थान मिळविले आहे. पिंपरी चिंचवड शहरासह देशातील ११४ व राज्यातील १२ शहरांचा सहभाग होता.
---
पालिका आयुक्त राजेश पाटील म्हणाले, ‘‘प्रशासनाचे कामकाज आणि त्याची अंमलबजावणी याबाबत नागरिकांचे मत जाणून घेणे हे प्रशासनाची कार्यक्षमता वाढविणेसाठी आवश्यक असा इझ ऑफ लिव्हिंग इंडेक्स आणि म्युनिसिपल परफॉरमेन्स इंडेक्सद्वारे प्राप्त होणाऱ्या माहितीमुळे महापालिकेतर्फे नागरिकांना शहराबद्दल नेमके काय वाटते, पालिकेतर्फे देण्यात येणा-या सुविधांबाबत नागरिकांचे मत काय आहे हे जाणून घेणे शक्य झाले आहे. देशपातळीवर शहराला मिळालेला चौथा क्रमांक हा नागरिकांचा प्रशासन व प्रशासनातील कामकाजावरील विश्वासाची पावती आहे.’’