पिंपरी-चिंचवड पालिका बांधणार ३४१८ सदनिका

By admin | Published: July 28, 2016 03:58 AM2016-07-28T03:58:13+5:302016-07-28T03:58:13+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेने बेघरांसाठी घरकुल उभारण्यासाठी आरक्षित जागांवर गृहप्रकल्प उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३ हजार ४१८ सदनिका

Pimpri-Chinchwad municipal corporation to construct 3418 house | पिंपरी-चिंचवड पालिका बांधणार ३४१८ सदनिका

पिंपरी-चिंचवड पालिका बांधणार ३४१८ सदनिका

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने बेघरांसाठी घरकुल उभारण्यासाठी आरक्षित जागांवर गृहप्रकल्प उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३ हजार ४१८ सदनिका बांधण्याचे नियोजन केले. चऱ्होली, रावेत, डुडुळगाव येथील भूखंडावर गृहप्रकल्प उभारले जातील.
महापालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या घरकुल उभारण्याची कामे सुरू आहेत. नियोजनानुसार ती पूर्ण झालेली नाहीत. पदाधिकाऱ्यांनी अनेक योजना जाहीर केल्या. मात्र, त्या पूर्णत्वास गेलेल्या नाहीत. घरकुलातील साडेतेरा हजार लाभार्थ्यांपैकी निम्म्याच लाभार्थींना घरकुल दिले आहे. (प्रतिनिधी)

- केंद्र सरकारचे अनुदान : दीड लाख
- राज्य सरकारचे अनुदान : एक लाख
- महापालिका हिस्सा : ७७ हजार ५०० रुपये
- लाभार्थी हिस्सा : पाच लाख रुपये
- एकूण किंमत : ८ लाख २७ हजार ५००

परिसरातील सदनिकांची संख्या
चऱ्होली : १४४२ सदनिका
रावेत : १०८१ सदनिका
डुडुळगाव : ८९६ सदनिका

Web Title: Pimpri-Chinchwad municipal corporation to construct 3418 house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.