पिंपरी-चिंचवड ‘स्थायी’च्या अध्यक्षांची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:15 AM2021-08-27T04:15:56+5:302021-08-27T04:15:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : न्यायालयाची दिशाभूल करून अंतरिम जामीन मिळविलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांची ...

Pimpri-Chinchwad 'Standing' president sent to jail | पिंपरी-चिंचवड ‘स्थायी’च्या अध्यक्षांची कारागृहात रवानगी

पिंपरी-चिंचवड ‘स्थायी’च्या अध्यक्षांची कारागृहात रवानगी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : न्यायालयाची दिशाभूल करून अंतरिम जामीन मिळविलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. लांडगे यांनी तात्पुरता जामीन मिळवण्यासाठी न्यायालयाला आईच्या आईचे (आजीचे) निधन झाले असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या वडिलांची मावशी गेली आहे. त्यांनी न्यायालयाला खोटी माहिती देत दिशाभूल केली असल्याचा युक्तिवाद सहायक सरकारी वकील ॲड. रमेश घोरपडे यांनी न्यायालयात केला. तो ग्राह्य धरीत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी लांडगेंचा जामीन फेटाळला.

होर्डिंगची वर्कऑर्डर मिळण्यासाठी १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी तक्रारदार जाहिरात ठेकेदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार नितीन लांडगे यांच्यासह त्यांचा स्वीय सहायक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (वय ५६, रा. भोसरी), शिपाई अरविंद भीमराव कांबळे (रा. भीमनगर, पिंपरी), संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे (रा. थेरगाव, वाकड) आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया (रा. धर्मराजनगर) यांना अटक करण्यात आली आहे.

नितीन लांडगे यांनी आईच्या आईचे निधन झाले असल्याचे सांगून तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज केला होता. गुरुवारी (दि. २६) लांडगे यांना न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांनी वैद्यकीय कारणास्तव पुन्हा जामीन मिळण्यासाठी अर्ज केला. मात्र, त्याला सहायक सरकारी वकील ॲॅड. रमेश घोरपडे यांनी विरोध केला. लांडगे यांच्या वतीने ॲॅड. प्रताप परदेशी यांनी बाजू मांडली. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने नितीन लांडगे यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना न्यायालयीन कोठडी देत त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली. शुक्रवारी (दि. २७) लांडगे यांच्यासह इतर आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Web Title: Pimpri-Chinchwad 'Standing' president sent to jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.