पिंपरी-चिंचवडमध्ये होणार ३२ प्रभाग?

By admin | Published: May 12, 2016 01:10 AM2016-05-12T01:10:47+5:302016-05-12T01:10:47+5:30

राज्यातील १४ महापालिकांसाठी चार वॉर्डांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय अंतीम टप्प्यात आहे. त्यावर पुढील मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Pimpri-Chinchwad will take part in 32 divisions? | पिंपरी-चिंचवडमध्ये होणार ३२ प्रभाग?

पिंपरी-चिंचवडमध्ये होणार ३२ प्रभाग?

Next

पिंपरी : राज्यातील १४ महापालिकांसाठी चार वॉर्डांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय अंतीम टप्प्यात आहे. त्यावर पुढील मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात संभ्रम आहे. चार वॉर्डांचा प्रभाग झाल्यास पिंपरी-चिंचवडमधील प्रभागांची संख्या ३२ होईल. एका प्रभागातील मतदारांची संख्या सुमारे ४५ ते ५० हजार असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
२०११च्या जनगणनेनुसार पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ इतकी आहे. फेब्रुवारी २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुमारे १२ लाख मतदार संख्या असेल. दोन वॉर्डांचा की चार वॉर्डांचा एक प्रभाग होणार, याबद्दल संभ्रमावस्था होती. चार वॉर्डांचा एक प्रभाग असावा, अशी भाजपाची आग्रही भूमिका होती. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार वॉर्डांच्या प्रभागाबद्दल सकारात्मक चर्चा झाली.
त्यामुळे असाच निर्णय होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. २००२ला तीन वॉर्डांचा एक प्रभाग अशा पद्धतीने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीची निवडणूक पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदा झाली. त्या वेळी ३५ प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणे १०५ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर २००७मध्ये एकसदस्यीय पद्धतीची निवडणूक १०५ वॉर्डांमध्ये झाली.
२०१२ची निवडणूक पुन्हा बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीची झाली. दोन वॉर्डांचा एक प्रभाग याप्रमाणे ६४ प्रभागांमध्ये निवडणूक घेण्यात आली. प्रत्येक प्रभागात दोन याप्रमाणे १२८ नगरसेवक निवडून आले होते. त्याचवेळी महिलांना ५० टक्के आरक्षणाची अंमलबजावणी झाली. आगामी २०१७च्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार वॉर्डांचा एक
प्रभाग अशा पद्धतीने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीची निवडणूक लढविली जाणार आहे. (प्रतिनिधी)चार वॉर्डांचा एक प्रभाग अशी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीची निवडणूक झाल्यास फायदा होईल, असा विश्वास भाजपा नेत्यांना वाटतो. भाजपाशिवाय अन्य प्रमुख राजकीय पक्षांना बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीबद्दल आक्षेप नाही. परंतु, दोन वॉर्डांचा एक प्रभाग व्हावा किंवा एकच वॉर्ड असावा, अशी त्यांची अपेक्षा होती. त्या दृष्टीने त्यांनी तयारी केली होती. चार वॉर्डांचा एक प्रभाग या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला छोट्या राजकीय पक्षांचा, संघटनांचा विरोध आहे. अशा पद्धतीच्या निवडणुकीमुळे छोट्या पक्षांचे अस्तित्व धोक्यात येईल, अशी भीती त्यांना वाटते.
सामान्य कार्यकर्त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढायची असेल, तर त्यांनाही चार जणांचे पॅनेल तयार करणे भाग पडणार आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्तेही अशा पद्धतीच्या निवडणुकीबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. काही राजकीय पक्षांना उमेदवारांचा शोध घेणे कठीण जाणार आहे. या पद्धतीच्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढणे अशक्य असल्याने कोणत्या ना कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळविण्याचा इच्छुकांकडून प्रयत्न होणार आहे.

Web Title: Pimpri-Chinchwad will take part in 32 divisions?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.