पिंपरी-चिंचवडला मानवाधिकार पुरस्कार
By admin | Published: December 24, 2016 12:29 AM2016-12-24T00:29:56+5:302016-12-24T00:29:56+5:30
मानवी हक्क आणि जागृतीच्या वतीने देण्यात येणारा मानवाधिकार राज्यस्तरीय पुरस्कार पिंपरी-चिंचवड शहराला मिळाल्याने
पिंपळे गुरव : मानवी हक्क आणि जागृतीच्या वतीने देण्यात येणारा मानवाधिकार राज्यस्तरीय पुरस्कार पिंपरी-चिंचवड शहराला मिळाल्याने शहराच्या नावलौकिकामध्ये भर पडली आहे. हा पुरस्कार निवृत्त न्यायाधीश गणेश देव यांच्या हस्ते शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी स्वीकारला.
राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये कोल्हापूर येथील व्हाइरट हाऊस (सामाजिक), सह्याद्री अॅडव्हेंचर ट्रेकर गु्रप महाबळेश्वर (आपत्कालीन), डॉ. गणेश शेख (वैद्यकीय), विजयकुमार मगर (प्रशासकीय सेवा), ललिता बाबर (क्रीडा), राहुल खळदकर, मनीषा गुरव (पत्रकारिता), माया खुटेगावकर (कला सांस्कृतिक) आदींना वीरचक्र एअर कमांडर अशोक शिंदे व निवृत्त न्यायाधीश गणेश देव, सुभाष यादव यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
राज्यस्तरीय विशेष पुरस्कारात शहराला प्रथम क्रमांक देण्यात आला आहे.
ठाणे शहराला द्वितीय क्रमांक देण्यात आला. शहराचा हा पुरस्कार शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी स्वीकारला. या वेळी पर्यावरण समिती राजू सावळे, राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, सचिव सोमनाथ सावंत, संचालिका संजना कपूर, अनिल कदम, सतीश लालबिगे, संगीता जोगदंड, विकास शहाणे उपस्थित होते. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सोमनाथ सावंत यांनी आभार मानले.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल निवड समितीने घेतल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. तसेच संस्थेतर्फे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. या वेळी संबंधितांच्या कार्याची दखल परीक्षकांनी घेतली असल्याचे संस्थेच्या पदाधिकारी सांगितले.
(वार्ताहर)