पिंपरी महापालिका आयुक्तांच्या कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह; आयुक्त निगेटिव्ह असल्याने 'ऑनफिल्ड'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 05:31 PM2022-01-10T17:31:06+5:302022-01-10T17:31:16+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या कुटुंबातील दोन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, आयुक्त निगेटिव्ह आहेत
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या कुटुंबातील दोन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, आयुक्त निगेटिव्ह आहेत. त्यामुळे कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह असतानाही आयुक्त कर्तव्यावर आहेत. शहरातील कोरोना रुणांवर उपाययोजना करण्यासाठी मॅरेथॉन बैठका घेत आहेत. उपाययोजना करीत आहेत. महापालिका भवनात दोन डोस पूर्ण झालेले असणाऱ्यांनाच परवानगी दिली जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांवर गेली आहे. मोरवाडीतून टेल्को चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अविष्कार हे आयुक्तांचे निवासस्थान आहे. मागील आठवडयात आयुक्तांच्या कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह आले. त्यानंतर आयुक्तांनी महापालिकेच्या यंत्रणेच्या माध्यमातून तपासणी करून घेतली. त्यात आयुक्तांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह सदस्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण होत आला आहे.
आयुक्त ऑनफिल्ड
गेल्या आठवडयात कोरोनाचा आलेख वाढत आहे. शहरात वाढता कोरोनाचा आलेख पाहता आयुक्तांच्या वतीने आरोग्य, वैद्यकीय विविध विभागाच्या बैठका सुरू आहेत. उपाययोजनासाठी बैठका सुरू केल्या आहेत. उपाययोजनांसाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरू आहे.
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू
''महापालिका परिसरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता, सर्वांनी काळजी घ्यावी. लक्षणे आढळल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. ज्या नागरिकांचे लसीकरण झाले नाही. अशांनी लसीकरण करून घ्यावे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. राज्य शासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन केले जाईल असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.''