पिंपरी महापालिका आयुक्तांकडुन भाजपला बदनाम करण्याचा डाव : महापौर उषा ढोरे यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 12:04 PM2020-08-21T12:04:27+5:302020-08-21T12:05:13+5:30
भाजप हा सत्ताधारी पक्ष असल्याने नाहक ही संशयाची सुई सत्ताधाऱ्यांच्याकडे येत आहे. शालेय साहित्य खरेदीचे तब्बल २ कोटी ४३ लाख रुपयांचे विषय मागे घेतले.
पिंपरी : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहाता शहरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा शासनाच्या आदेशानुसार बंद आहेत. पुढील महिन्यात शाळा सुरू होणार आहेत, त्यामुळे शालेय साहित्य खरेदीचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला होता. शालेय साहित्य खरेदीचे तब्बल २ कोटी ४३ लाख रुपयांचे विषय मागे घेतले.महापालिका आयुक्तांकडुन भाजपला बदनाम करण्याचा डाव आहे, असा आरोप महापौर उषा ढोरे यांनी केला आहे.
पिपरी चिंचवड शहरातील खाजगी शाळांनी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले शालेय साहित्य व वह्या, पुस्तकांची विक्री सुरु आहे. त्याचप्रमाणे शासनाने महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके पाठविली असुन त्याचे विद्यार्थ्यांना वाटप देखील केले आहे.
महापालिकेच्या स्थायी समिती सभेच्या विषयपत्रिकेवर पुरवठादारांकडून मागील आदेशान्वये चित्रकला, प्रयोग, नकाशा वही, विविध अभ्यासपुरक पुस्तके १ कोटी ११ लाख ८० हजार ७१५ आणि १ कोटी ३१ लाख ४१ हजार ७१० रुपयांच्या वह्या असे २ कोटी ४३ लाख रुपयांचे शालेय साहित्य खरेदीचे प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवले होते. त्यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. आयुक्तांनी शालेय साहित्य खरेदीचे तब्बल २ कोटी ४३ लाख रुपयांचे विषय मागे घेतले. यावर सत्ताधारी भाजपने आक्षेप घेतला आहे . आयुक्तावर टीका केली आहे.
महापौर उषा ढोरे म्हणाल्या, कोरोना पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीची खरेदी करण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. या कलमानुसार आयुक्तानी कोविड-१९ च्या अनुषंगाने माहे मार्च २०२० पासुन विविध अत्यावश्यक साहित्याची थेट पद्धतीने खरेदी केलेंली आहे खो तर हा विषय महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्याशी निगडीत होता. या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य खरेदीचा हा विषय आयुक्तांनीच हा विषय कोणाच्या दबावाखाली माघारी घेतला. आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयामुळे व त्याच्या अशा भूमिकेमुळे भाजप हा सत्ताधारी पक्ष असल्याने नाहक ही संशयाची सुई सत्ताधाऱ्यांच्याकडे येत असुन भाजपला बदनाम करण्याचा डाव आयुक्तांकडुन सुरु असल्याचा संशय बळावत आहे.''