जुन्नर तालुका पूर्व भागातील पिंपरी पेंढार परिसरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:09 AM2021-04-17T04:09:28+5:302021-04-17T04:09:28+5:30

उन्हाळी हंगामातील बाजरीचे पीक हे पशुधनास चारा आणि अन्नधान्य दोन्हीही मुबलक होत असल्याने बहुसंख्य शेतकरी उन्हाळी बाजरीचे पीक घेताना ...

In Pimpri Pendhar area in the eastern part of Junnar taluka | जुन्नर तालुका पूर्व भागातील पिंपरी पेंढार परिसरात

जुन्नर तालुका पूर्व भागातील पिंपरी पेंढार परिसरात

Next

उन्हाळी हंगामातील बाजरीचे पीक हे पशुधनास चारा आणि अन्नधान्य दोन्हीही मुबलक होत असल्याने बहुसंख्य शेतकरी उन्हाळी बाजरीचे पीक घेताना दिसतात. बाजरीच्या पिकास हवामान पोषक ठरू लागले आहे. त्यामुळे बाजरीचे पीक हिरवेगार होऊन जोमात येत आहे. उत्पन्नही चांगल्या प्रकारे मिळणार असल्यामुळे शेतकरीवर्ग सकाळी व दुपारी पिकाचे राखण करण्यास व्यस्त आहेत.

या भागात पाण्याची कमतरता व वरून रखरखीत उन्हाचा मारा त्यामुळे हिरव्या पिकांचा प्रश्नच येत नाही. सोबतच हिरवा चारा तर फारच कमी पाहायला मिळतो. अशा वेळी बाजरीचे पीक उपयोगी ठरते. एकंदरीत सध्या तरी कांदा पिकापेक्षा बाजरी बरी असे शेतकऱ्यांचे मत झाले आहे.

--

फोटो क्रमांक : १६आळेफाटा पीक जोमात

फोटो- पिंपरी पेंढार येथील राजकुमार गणपत कुटे यांच्या शेतातील जोमदार बाजरीचे पीक.

Web Title: In Pimpri Pendhar area in the eastern part of Junnar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.