पिंपरी पेंढार ते जेजुरी बैलगाडीने काठी पालखी सोहळ्याची १५२ वर्षांची परंपरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:10 AM2021-02-25T04:10:52+5:302021-02-25T04:10:52+5:30

पिंपरी पेंढार ते जेजुरी पायीवारी काठी पालखी सोहळ्याचे आज (बुधवारी) प्रस्थान होणार होते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही १५२ ...

Pimpri Pendhar to Jejuri bullock cart breaks the 152 year tradition of Kathi Palkhi ceremony | पिंपरी पेंढार ते जेजुरी बैलगाडीने काठी पालखी सोहळ्याची १५२ वर्षांची परंपरा खंडित

पिंपरी पेंढार ते जेजुरी बैलगाडीने काठी पालखी सोहळ्याची १५२ वर्षांची परंपरा खंडित

Next

पिंपरी पेंढार ते जेजुरी पायीवारी काठी पालखी सोहळ्याचे आज (बुधवारी) प्रस्थान होणार होते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही १५२ वर्षांची परंपरा खंडित झाल्याने भक्त भाविकांत नाराजी दिसत होती.

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरी खंडोबाच्या दर्शनासाठी लाखो भाविक जातात. या खंडोबाच्या दर्शनासाठी पिंपरी पेंढार गावचे भक्तभाविक गेल्या १५२ वर्षांपासून बैलगाडीने जाण्याची परंपरा जपत आहेत. ग्रामस्थ भक्तभाविक मोठ्या आनंदात उत्साहात आपले कुलदैवत जेजुरीचा खंडोबा येथे पायी वारीने जातात.

या काठी पालखी सोहळ्याचा कालावधी १५ दिवसांचा असतो. पिंपरी पेंढार परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सोहळ्यामध्ये सहभागी होतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त ६ भविकांनी काठी खंडोबाचे स्थळ असलेल्या ठिकाणी जाऊन काठी दर्शन घेतले.

फोटो-1) २०२१ रोजी होणारे प्रस्थान रद्द करून खंडोबाचे स्थळ असलेल्या ठिकाणी जाऊन काठी दर्शन घेतले

2) पिंपरी पेंढार ते जेजुरी काठी पालखी सोहळ्याचे प्रस्थान फेब्रुवारी २०२० मागील वर्षीचे??????

Web Title: Pimpri Pendhar to Jejuri bullock cart breaks the 152 year tradition of Kathi Palkhi ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.