पिंपरी पेंढार-पिंपळवंडी रस्त्याची झाली दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:26 AM2018-08-27T00:26:23+5:302018-08-27T00:26:49+5:30
जुन्नर तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात असणारी पिंपरी पेंढार व पिंपळवंडी ही दोन गावे राजकीय दृष्टीने अतिशय महत्त्वाची असणारी आहेत.
पिंपरी पेंढार : जुन्नर तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात असणारी पिंपरी पेंढार व पिंपळवंडी ही दोन गावे राजकीय दृष्टीने अतिशय महत्त्वाची असणारी आहेत. अशा या कल्याण-नगर महामार्गावर असणारे पिंपरी पेंढार येथून पिंपळवंडीमार्गे पुणे-नाशिक महामार्गाचे अंतर अवघे पाच किलोमीटर अंतरावर; परंतु सध्या या रस्त्यावर सर्वत्र दगडगोटे व खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
हा रस्ता दळणवळणासाठी जवळचा मार्ग म्हणून वापरला जातो. शेतकऱ्यांना नारायणगाव या ठिकाणी टोमॅटो वा इतर भाजीपाला, खते, बी-बियाणे, यांची वाहतुक करण्यासाठी याच मार्गाचा वापर होत असतो. परंतू, सध्या या रस्त्याची खूपच दुरवस्था झाल्याने आळेफाटा मार्गे नारायणगाव असा प्रवास सर्वसामान्य शेतकºयांना करावा लागत आहे. यामुळे हे अंतर दहा किलोमीटरने वाढते. त्याचप्रमाणे वेळ आणि खर्च वाढतो. या रस्त्याचे काम झाले नाही तर या रस्त्याने जाणे-येणे कठीण होईल.