पिंपरीकर गारठले!

By Admin | Published: December 30, 2014 12:17 AM2014-12-30T00:17:06+5:302014-12-30T00:17:06+5:30

शहर व उपनगरामध्ये थंडीचा कडाका खूपच तीव्र झाल्याने आज तापमानात मोठी घट झाली. शहराचे किमान तापमान ७.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

Pimprikar is sweet! | पिंपरीकर गारठले!

पिंपरीकर गारठले!

googlenewsNext

पिंपरी : शहर व उपनगरामध्ये थंडीचा कडाका खूपच तीव्र झाल्याने आज तापमानात मोठी घट झाली. शहराचे किमान तापमान ७.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. यंदाच्या हंगामातील हे निचांकी तापमान ठरले आहे. पारा घसरल्याने पिंपरीकर गारठल्याचे चित्र आज शहरात दिसत होते. बोचऱ्या थंडीमुळे रात्री शहरातील रहदारी कमी झाली होती.
दहा दिवसांपूर्वी शहराच्या तापमानात वेगाने घट होऊन तापमान ८ अंशापर्यंत खाली आले होते. मात्र ढगाळ हवामानामुळे गेल्या आठवडयात तापमानात मोठी वाढ झाली आणि थंडी शहरातून गायब होण्याच्या मार्गावर पोहोचली होती. मात्र गेल्या २ दिवसांपासून शहराच्या तापमानात पुन्हा घट नोंदविली गेली. ती आजही कायम होती. शहराच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा २.८ अंशांनी घट झाली होती. २४ तास आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आणि तापमानात वाढ होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.(प्रतिनिधी)

४सकाळी घरातून बाहेर निघताना पुणेकरांनी स्वेटर्स, जर्किन, कानटोप्या, हातमोझे घातलेले होते. दुपारीही
हवेत गारवा जाणवत होता. रात्री पुन्हा थंडीचा कडाका आणखी वाढला. यामुळे रात्री ९ नंतर शहरातील रहदारी कमी झाली होती. रस्त्यांवरून चालत जाणाऱ्यांची संख्या रोडावली होती.

Web Title: Pimprikar is sweet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.