पिंकेथॉन ही महिला परिवर्तनाची सुरुवात : मिलिंद सोमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 06:10 PM2017-10-10T18:10:19+5:302017-10-10T18:12:54+5:30

पुणे पिंकेथॉनची सुरुवात २६ नोव्हेंबर रोजी मुलिक ग्राउंड, कल्याणी नगर येथून  होणार आहे.

Pinchathon commenced Women's Transformation: Milind Soman | पिंकेथॉन ही महिला परिवर्तनाची सुरुवात : मिलिंद सोमण

पिंकेथॉन ही महिला परिवर्तनाची सुरुवात : मिलिंद सोमण

Next
ठळक मुद्देपिंकेथॉन ही केवळ मॅरेथॉन नसून परिवर्तनाची सुरुवात पिंकेथॉनमध्ये ५० दृष्टिहीन मुली सहभागी होणार आहेत.या मुलींसाठी खास ब्रेल लिपीत असणारे पदक तयार करण्यात आले आहे.

पुणे : ‘महिला सशक्तीकरणासाठी महिलांनी स्वत: प्रयत्न करणे आवश्यक आहे. सशक्तीकरण हे केवळ महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याशी निगडित नसून, महिलांचे आरोग्यही तितकेच महत्वाचे आहे, असे मत पिंकेथॉनचे संस्थापक मिलिंद सोमण यांनी पाचव्या पिंकेथॉनची घोषणा करताना व्यक्त केले. पुणे पिंकेथॉनची सुरुवात २६ नोव्हेंबर रोजी मुलिक ग्राउंड, कल्याणी नगर येथून  होणार आहे.
ते म्हणाले, ‘पिंकेथॉन ही केवळ मॅरेथॉन नसून परिवर्तनाची सुरुवात आहे. ही चळवळ भारतातील महिलांना सक्षमतेसाठी प्रयत्न करायला एक व्यासपीठ निर्माण करून देईल. आपल्या स्वत: च्या आरोग्यावर नियंत्रण ठेवणे, स्वत:चा सन्मान करणे आणि आपल्या मूल्यांना समजून घेऊन त्यांचा सन्मान करणे, हे सक्षमीकरणाचे पहिले पाऊल आहे हे याद्वारे महिलांना समजून घेता येईल. याही वर्षी पुणेकर मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवतील.’
यावेळी धावपटू मान कौर, अभिनेत्री सई ताम्हणकर आदी मान्यवर उपस्थित होते. पिंकेथॉनमध्ये ५० दृष्टिहीन मुली सहभागी होणार आहेत. या मुलींसाठी खास ब्रेल लिपीत असणारे पदक तयार करण्यात आले आहे. मुख्य दिवसासाठी त्यांच्यासाठी डोळस धावपटूंच्या मदतीने खास प्रशिक्षण सत्रांची रचना केली आहे.  ३ किमीमध्ये पळणार्‍या दृष्टिहीन मुलींच्या स्क्वाडसाठी निवांत व्हिजनमधील दृष्टिहीन मुलगी अभया मुकुंद हिची शुभंकर म्हणून घोषणा झाली आहे. या  प्रकारात  ३० श्रवणशक्ती बाधित मुलीही भाग घेणार आहेत. कर्करोगातून वाचलेल्या मिताली उपाध्ये यांची ५ किमी श्रेणी रनसाठी शुभंकर म्हणून घोषणा झाली आहे.  

Web Title: Pinchathon commenced Women's Transformation: Milind Soman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.