शिखर कावडीने कडा सर!
By Admin | Published: February 26, 2017 03:30 AM2017-02-26T03:30:32+5:302017-02-26T03:30:32+5:30
पानवली (ता. दौंड) येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत शंभो महादेवाच्या यात्रेनिमित्त भाविकभक्तांनी हरहर महादेवचा जयघोष करत पवित्र अशा भीमा नदीच्या पाण्याने भरून
पाटेठाण : पानवली (ता. दौंड) येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत शंभो महादेवाच्या यात्रेनिमित्त भाविकभक्तांनी हरहर महादेवचा जयघोष करत पवित्र अशा भीमा नदीच्या पाण्याने भरून आणलेल्या शिखर कावडीने उंच कडा सर करत जल्लोषात भक्तिपूर्ण वातावरणात महादेवाला जलाभिषेक घालण्यात आला.
दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त पानवली येथील ग्रामदैवत तसेच उंच डोंगरावर असलेल्या शंभो महादेवाची मोठ्या स्वरूपात यात्रा भरवली जाते. पहाटे शिवलिंगाला अभ्यंग स्नान, विधिवत पूजा, महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर दुपारी बाराच्या दरम्यान वाजतगाजत आलेल्या कावडींनी भीमा नदीच्या पाण्याने महादेवाला धार घालण्यात आली. कावडींचा कार्यक्रम पाहण्यासाठी पानवली, वडगाव बांडे, कोरेगाव भिवर, टाकळी भीमा या परिसरातील भक्तांनी मोठी गर्दी केली होती. शेवटी शंभो महादेवाला धार घातल्यानंतर आरती होऊन यात्रेची सांगता झाली. या वेळी देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष कैलास गाढवे, बन्सीलाल फडतरे, भीमाजी मेमाणे, शहाजी कुलाळ, नानासाहेब ठोंबरे, सुरेश चव्हाण, किशोर गाढवे, अमोल कुलकर्णी, गोरख जगताप उपस्थित होते.