पिपंळगाव जोगा कालव्याला झुडपांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:11 AM2021-01-23T04:11:22+5:302021-01-23T04:11:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी पेंढार : पिंपळगाव जोगा धरणाच्या डाव्या कालव्याच्या आजुबाजुला झाडाझुडपांचा विळखा झाला असून ...

Pipalgaon Joga canal is covered with bushes | पिपंळगाव जोगा कालव्याला झुडपांचा विळखा

पिपंळगाव जोगा कालव्याला झुडपांचा विळखा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी पेंढार : पिंपळगाव जोगा धरणाच्या डाव्या कालव्याच्या आजुबाजुला झाडाझुडपांचा विळखा झाला असून शेतकऱ्यांना वरदान ठरलेला हा कालव्याला सध्या जंगलाचे स्वरूप आले आहे. या परिसरात बिबट्याचा वावर जास्त असल्याने या झुडपामध्ये लपून कालव्या जवळ येणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्ला करण्याची शक्यता आहे. तसेच या झुटपांमुळे कालव्याच्या अस्तरिकरणालाही धोका निर्माण झाला आहे.

जुन्नरचा पुर्व पट्टा आणि नगर जिल्ह्यातील पारनेर, आळकुटी आदी भागासह जुन्नरच्या बेल्हे, राजुरी, आळे, वडगाव आनंद, पिंपरी पेंढार, उंब्रज, काळवाडी गावांना या कालव्याच्या पाण्याने एक नवजीवनच मिळाले आहे. या कालव्याच्या दोन्ही बाजूंनी अगदी कॅनॉलच्या अस्तरिकरणाच्या जवळ मोठंमोठी बाभळीची झाडे झाली आहेत. तसेच कॅनॉलमध्ये दगडगोट्यांसह इतरही घाण पसरली आहे या झाडांच्या मुळांनी अनेक ठिकाणी अस्तरीकरणास भेगा पडलेल्या आहेत.भविष्यात याच झाडाझुडपंच्या मुळांनी कॅनॉलला तडे जाऊन फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उंब्रज, पिंपरी पेंढार, वाळुंजवाडी येथे कालव्या शेजारी झुडपे वाढली आहे. या ठिकाणी बिबट्याचा वावर जास्त असल्याने बिबट्याला लपण्याची जागा आहे. यामुळे या कालव्याच्या बाजुची झुडपे तोडण्याची मागणी

कुकडी पाटबंधारे विभागाकडे ग्रामस्थांनी केली आहे.

फोटो - पिंपळगाव जोगा धरण डावा कालव्यास पिंपरी पेंढार येथे कॅनॉलला वाढलेली मोठंमोठी बाभळीची झाडे, कचरा, दगडगोटे

Web Title: Pipalgaon Joga canal is covered with bushes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.