पिंपळवंडीत बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 02:21 AM2017-09-04T02:21:52+5:302017-09-04T02:22:20+5:30
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र अद्यापही सुरूच आहे. चाळकवाडी येथे बिबट्याने शेळीवर हल्ला केली असल्याची घटना ताजी असतानाच रविवारी
पिंपळवंडी : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र अद्यापही सुरूच आहे. चाळकवाडी येथे बिबट्याने शेळीवर हल्ला केली असल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (दि.३) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पिंपळवंडी येथे पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला करून वासराचा फडशा पाडला.
पिंपळवंडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर सातत्याने हल्ले होत आहेत. शुक्रवारी (दि.१) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास चाळकवाडी येथील सोनाली अविनाश सोनवणे यांच्या घरासमोरील अंगणात भांडी घासत असताना बिबट्याने त्यांच्यासमोर शेळीवर हल्ला केला. या हल्ल्याने त्यांना काही काळ बोलताच येत नव्हते. ही घटना घडल्यानंतर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पिंपळवंडी उंब्रज रस्त्यालगत राहत असलेले निखिल वसंत वाघ यांच्या वासरावर हल्ला केला. या आवाजाने वसंत वाघ दरवाजा उघडून घराबाहेर आले असता बिबट्या वासराला घेऊन बाजूच्या शेतात असलेल्या गवतामध्ये
गेला.