पिस्तूल बाळगणारा अटकेत
By admin | Published: April 26, 2017 04:05 AM2017-04-26T04:05:11+5:302017-04-26T04:05:11+5:30
शस्त्रास्त्र जवळ बाळगल्याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने एका आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : शस्त्रास्त्र जवळ बाळगल्याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने एका आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. आरोपीकडून २० हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
शशिकांत गंगाप्पा नाईक (वय २३, रा. विष्णूकृपानगर, शिवाजीनगर) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणीविरोधी पथकाचे पोलीस अधिकारी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गस्त घालत असताना पथकातील पोलीस नाईक सचिन अहिवळे यांना एक व्यक्ती पिस्तूल आणि काडतूस घेऊन अलंकार टॉकीज चौकमार्गे पुणे स्टेशन येथे आला असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून त्याच्याकडून एक लोखंडी पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. आरोपीवर चंदननगर येथे ३०७चे ५ ते ६ गुन्हे दाखल केले आहेत. यात किती व्यक्ती सहभागी आहेत त्यादृष्टीने तपास सुरू आहे.
गुन्हे शाखेचे प्रभारी अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक (अति. कार्य) सतीश शिंदे व सहायक पोलीस निरीक्षक सुनील गवळी, विठ्ठल शेलार, सचिन अहिवळे, प्रमोद मगर, किरण चोरगे, शिवानंद बोले, प्रशांत पवार, नीलेश देसाई, फिरोज बागवान, मंगेश पवार, वनराज पवार, राजू पवार, कांता बनसुडे यांनी ही कारवाई केली.