रिक्षा चालकाकडून पिस्तूल जप्त, खबऱ्यानं दिली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 03:03 AM2018-08-27T03:03:56+5:302018-08-27T03:04:13+5:30
दत्तवाडी पोलिसांची कारवाई : दोन काडतुसे हस्तगत
पुणे : पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालीत असताना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून दत्तवाडी पोलिसांनी रिक्षाचालकाकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई म्हसोबा चौकाजवळील गणपती मंदिराजवळ करण्यात आली.
संतोष राजू शेंडगे (वय २९, रा. घर क्रमांक ४२४, मनपा शाळेजवळ, दत्तवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. शेंडगे हा रिक्षाचालक आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी गणेशोत्सव, दहीहंडी सणांनिमित्त गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची गस्त सुरू होती. त्या वेळी पोलीस नाईक सुधीर घोटकुले व पोलीस शिपाई रोहन खैरे यांना खबºयामार्फत शेंडगे याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, तपास पथकाचे उपनिरीक्षक अनिल डफळ, तानाजी निकम, सुधीर घोटकुले, रोहन खैरे, गाढवे, सागर सुतकर यांनी म्हसोबा चौकात सापळा लावला. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक देविदास घेवारे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक सोमेश्वर यादव करीत आहेत.
खबºयाने दिली होती माहिती
गणपती मंदिराजवळ आरोपी शेंडगे हा संशयास्पद अस्वथेत उभा असलेला दिसला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने नाव पत्ता सांगितला. त्याच्या अंगझडतीमध्ये २५ हजारांचे बेकायदा पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण २५ हजार ३०० रुपयांची अग्निशस्त्रे मिळून आली. शेंडगे हा रिक्षाचालक आहे.