पिस्तुलाच्या धाकाने गोल्ड लोनच्या कार्यालयावर दरोडा; ५० लाखांचा ऐवज लुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 04:02 PM2019-12-05T16:02:48+5:302019-12-05T16:04:07+5:30
गेल्या १५ दिवसात शस्त्राच्या धाकाने सोने लुटून नेण्याची शहरातील ही दुसरी घटना
पुणे : पुणे - नगर रोडवरील सोन्याच्या तारणावर कर्ज देणाऱ्या गोल्ड लोनच्या कार्यालयावर एका चोरट्याने पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकल्याची घटना घडली़. गेल्या १५ दिवसात शस्त्राच्या धाकाने सोने लुटून नेण्याची शहरातील ही दुसरी घटना आहे़. चोरट्याने किती सोने लुटून नेले याची मोजदाद केली जात असून प्राथमिक अंदाजानुसार किमान ५० लाख रुपयांचा ऐवज लुटला असल्याचे सांगण्यात येत आहे़. हा प्रकार चंदननगर येथील भाजी मार्केटजवळील आनंद इम्पायर या बहुमजली इमारतीच्या तळमजल्यावर आयआयएफएल गोल्ड लोनचे कार्यालय आहे़. हे कार्यालय सकाळी दहा वाजता उघडल्यानंतर दोन महिला व एक पुरुष कर्मचारी कार्यालयात बसले होते़. सोने तारण ठेवण्याच्या बहाण्याने साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास ४ ते ५ जण कार्यालयात आले़. त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवला़ त्यांच्यातील एक जण बाहेर उभा राहिला होता़. दोघांनी कर्मचाऱ्यांना पिस्तुल दाखवून एकाने येथील सोने बॅगेत भरले व ते पळून गेले़. चोरटे पळून गेल्यावर कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली़. चंदननगर पोलीस तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत़. त्यांनी किती ऐवज लुटून नेला, याची मोजदाद सुरु आहे़ साधारण ५० लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची प्राथमिक माहिती आहे़. कार्यालयातील सीसीटीव्हीची तपासणी करण्यात येत आहे़.
़़़