बारामतीमध्ये २० तलवारींसह पिस्तूल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:11 AM2021-04-22T04:11:34+5:302021-04-22T04:11:34+5:30
नितीन खोमणे हा तलवारी आणि एक पिस्तूल विक्रीसाठी पिंपळीतून बारामतीत येणार असल्यची माहिती सहायक फौजदार शिवाजी निकम यांना मिळाली ...
नितीन खोमणे हा तलवारी आणि एक पिस्तूल विक्रीसाठी पिंपळीतून बारामतीत येणार असल्यची माहिती सहायक फौजदार शिवाजी निकम यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सपोनि प्रकाश वाघमारे, निकम, अकबर शेख, तुषार चव्हाण, दशरथ इंगोले, अतुल जाधव, होमगार्ड साळुंके यांनी बांदलवाडीत नीरा डावा कालव्यालगत सापळा रचला. या वेळी खोमणे हा दुचाकीवरून (एमएच-४२, जी २८१६) येत असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सापडलेल्या गोणीत तब्बल २० तलवारीसह एक पिस्तूलही मिळाले. त्याने या तलवारी अमृतसर (पंजाब) येथून बारामतीत विक्रीसाठी आणल्या होत्या. त्याच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा, मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोमणे याच्या विरोधात यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत.