वाडा रस्त्यावर खड्डे, वाहनचालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:13 AM2021-09-14T04:13:35+5:302021-09-14T04:13:35+5:30

राजगुरुनगर शहरातून शिरूर-भीमाशंकर रस्ता जातो. या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. राजगुरुनगर शहरात जाणार हा मार्ग असल्याने दुचाकी व चारचाकीधारकांची ...

Pits on the castle road, plagued motorists | वाडा रस्त्यावर खड्डे, वाहनचालक त्रस्त

वाडा रस्त्यावर खड्डे, वाहनचालक त्रस्त

Next

राजगुरुनगर शहरातून शिरूर-भीमाशंकर रस्ता जातो. या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. राजगुरुनगर शहरात जाणार हा मार्ग असल्याने दुचाकी व चारचाकीधारकांची सतत वर्दळ असते. तसेच या रस्त्यावरून मालवाहक ट्रक इतर वाहने जात असतात. या रस्त्यावर वाडारोड येथील संगम क्लॉसिक व हॉटेल धनराज या दरम्यान रस्त्यावर मोठे खड्डे पडून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचा वापर कामगार, शेतकरी, विद्यार्थी, सोबत चास, वाडा, डेहणे पुढे भीमाशंकरला या रस्त्याचा जाण्यासाठी उपयोग होत असतो. दुचाकी, चारचाकीचालकांना मार्ग काढताना रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच ट्रक व चारचाकीच्या टायरने खड्यातील चिखल शेजारून जाणऱ्या पादचाऱ्याच्या अंगावर उडत आहे.

थोडा जरी पाऊस पडला तरी खड्ड्यात पाणी साचते. या रस्त्यावरून सातत्याने वाहनांची वर्दळ सुरू असून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने हा रस्ता धोकादायक ठरत आहे. अनेकदा खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार घसरून पडून अपघाताच्या घडत आहेत. यातून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बांधकाम विभागाने रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

१३ राजगुरुनगर

राजगुरुनगर शहरातील वाडारोडवर पडलेले खड्डे आणि त्यात साचलेले पाणी.

Web Title: Pits on the castle road, plagued motorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.