पालखी मार्गावरील खड्डे बुजवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:13 AM2021-01-25T04:13:34+5:302021-01-25T04:13:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाल्हे : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर पावसाळ्यादरम्यान मोठे खड्डे पडले होते. यामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाल्हे : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर पावसाळ्यादरम्यान मोठे खड्डे पडले होते. यामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. या बाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात आली आहे.
पुणे-पंढरपूर मार्गाची खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. या मार्गावरून
पंढरपूर जेजुरी या तीर्थक्षेत्राकडे जाणारे व या परिसरात औद्योगिक क्षेत्र देखील असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वहातूक सुरू असते. हा रस्ता केंद्र सरकारने ताब्यात घेतला आहे. आळंदी ते पंढरपूर दरम्यान या रस्त्याचे सहा पदरीकरण होणार आहे. त्यासाठी भूसंपादनाचे काम चालू आहे. मात्र काम केव्हाही चालू होऊ द्या सध्या रस्त्यावरील खड्डे बुजवणाऱ्या ठेकेदाराकडून पुन्हा खड्डे बुजवून घ्यावेत, अशी मागणी पिसुर्टी गावचे माजी सरपंच अशोक बरकडे, राजेंद्र बरकडे, बाळासाहेब चोरमले, वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले व महात्मा फुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष सूर्यकांत भुजबळ, दादा म्हेत्रे, अमोल भुजबळ यांच्यासह ग्रामस्थांनी मागणी केली केली होती. सध्या या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. उर्वरीत दुरूस्तीच्या कामाबाबत संबंधित ठेकेदाराला सूचना देऊन लवकरात लवकर पुन्हा खड्डे बुजवण्यात येतील, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग पुणे विभागाचे अभियंता अशोक गिरमे यांनी सांगितले.
फोटो ओळ. पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर रस्त्यावर पडलेले खड्डे.