राजगुरुनगर बसस्थानकात खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:08 AM2021-07-22T04:08:22+5:302021-07-22T04:08:22+5:30
राजगुरूनगर: येथील बसस्थानक आवारात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. त्यामुळे प्रवशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच ...
राजगुरूनगर: येथील बसस्थानक आवारात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. त्यामुळे प्रवशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच बसस्थानकात येणाऱ्या बस चालकांनाही या खड्डयांमुळे कसरत करावी लागत आहे. एवढेच नाही तर बसस्थानकांत अनेक समस्या असल्याने प्रवाशांताकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. परिवहन मंडळाने रस्त्याची डागडुजी करण्याचबरोबरच इतर समस्यांही सोडवाव्यात अशी मागणी जोर धरु लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासुन सुरू झालेल्या पावसामुळे राजगुरूनगर बसस्थानक आवारातील रस्त्यावर खड्डे पडले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. जागोजागी खड्डयांमध्ये पाणी असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानकांचे आधुनिक नुतनीकरण्याचे काम वर्षापुर्वी पुर्ण झाले आहे. मात्र या ठिकाणी सोयीपेक्षा असुविधाच अधिक असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. बँक, महाविद्यालय व विविध सरकारी कामानिमित्त प्रवाशांची वर्दळ असते.बसस्थानकात दिवसभर शेकडो बसेसची ये - जा असते. त्यामुळे परिसर नेहमी गजबललेला असतो. मात्र बसस्थानकात जागोजागी खड्डे पडून पाण्याची डबकी निर्माण झाली आहेत.
बस चालकांसह प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. स्थानक आवारात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. त्याचवेळी बस आल्यावर चिखलाचे गढुळ पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत आहे. कामानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आधिक आहे. मात्र प्रवाशांना यातुनच मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे वृध्द आणि महिला प्रवाशांचे हाल होत आहे. बसस्थानकात स्वच्छतागृहाची व्यवस्थित व्यवस्था व स्वच्छता नसल्याने प्रवाश्यांची गैरसोय होते. जे स्वच्छतागृह आहे त्याची दुरवस्था झाली असून, तेथे अस्वच्छता असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
२१ राजगुरुनगर खड्डे
राजगुरूनगर बसस्थानक आवारात रस्त्यावर खड्डे पडून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होत आहे.