राजगुरुनगर बसस्थानकातील खड्डे पदरमोड करून बुजवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:09 AM2021-05-22T04:09:49+5:302021-05-22T04:09:49+5:30
सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे राजगुरुनगर येथून तालुक्यात जाणाऱ्या एसटी सेवा गेल्या महिन्यापासून बंद आहे. पुणे या ठिकाणावरून काही एसटी ...
सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे राजगुरुनगर येथून तालुक्यात जाणाऱ्या एसटी सेवा गेल्या महिन्यापासून बंद आहे. पुणे या ठिकाणावरून काही एसटी बसेस येत असतात. स्थानक आवारात काही महिन्यापासून मोठ मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे ये-जा करणाऱ्या एसटी बसेच या खड्ड्यात आदळत होत्या. त्यामुळे प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत होता. तसेच एसटी बसेसलाही नुकसानीला सामोरे जावे लागत होते. ही गोष्ट कर्मचाऱ्यांच्या लक्षात येत होती. वाहतूक निरीक्षक व्ही. एन. पवळे, महेश विटे, कर्मचारी अमित जगताप, राजेंद्र पवार, बाळू नांगरे, शरद काळे, किरण जाधव, बाळू लोहकरे, बाबाजी गाढवे, राजेश टोके, दादा खळदकर व इतर एसटी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत पैसे गोळा केले. स्वखर्चाने सिमेंट व वाळू आणून स्थानक आवारात पडलेले ८ मोठे मोठ्ठे खड्डे श्रमदान करून बुजविण्यात आले.
२१ राजगुरुनगर
राजगुरुनगर बसस्थानक आवारात पडलेले खड्डे श्रमदान करून बुजविताना एसटी कर्मचारी.