पालखी महामार्गावरील दौंडज खिंड ते निरा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:10 AM2021-03-17T04:10:25+5:302021-03-17T04:10:25+5:30
वाल्हे. वाल्हे.- पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरील दौंडज खिंड ते निरा या २० किलोमीटरच्या रस्त्यावरील दौंडज खिंड, दौंडज, वाल्हे, कामठवाडी, ...
वाल्हे.
वाल्हे.- पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरील दौंडज खिंड ते निरा या २० किलोमीटरच्या रस्त्यावरील दौंडज खिंड, दौंडज, वाल्हे, कामठवाडी, पिसुर्टी, जेऊर फाटा, पिंपरे आदी गावांमधून जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरुन जाताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, त्यामधून काही वेळा अपघात घडले आहेत. दरम्यान या पालखी महामार्गाची त्वरित डागडुजी करावी, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग पुणे यांनी फुरसुंगी पासून, दिवे घाट , सासवड, जेजुरी येथील खड्डे बुजवले. मात्र, सर्वाधिक धोकादायक खड्डे दौंडज खिंड ते निरा येथील अरुंद रस्त्यावर आहेत. मात्र संबंधित प्रशासनाने, याच मार्गावरील खड्डे बुजवले नाहीत. पिसुर्टी फाटा ते लोणंद या मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले असून, पिसुर्टी फाटा ते दौंडज खिंड या अरुंद रस्त्यावरील खड्डे मात्र संबंधित प्रशासनाने बुजवले नाहीत.
साखर कारखाने सुरू झाले असल्याने, याच महामार्गावरून, पुरंदर तालुक्यातील जवळपास सर्वच ऊस वाहनांना याच खड्डेमय मार्गावरुन प्रवास करावा लागत असून, खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नांमध्ये ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर- ट्रॉली उलटून उपघात झाले आहेत.
पुणे- पंढरपूर पालखी महामार्ग रूंदीकरणाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार असल्याची चर्चा वाल्हे परिसरामध्ये आहे. माञ प्रत्यक्षात जेव्हा पालखी महामार्ग रूंदीकरणाचे काम संबंधित विभागाने कधीही सुरू करूद्यात, त्या आगोदर या महामार्गावरील खड्डे आगोदर बुजवून साईड पट्टीच पूर्ण भरून घ्यावी. अशी मागणी येथील ग्रामस्थ, प्रवाशी करत आहेत.
मागील काही वर्षांत शासनाने दिवे घाट ते जेजुरी औद्योगिक वसाहत या पालखी महामार्गावरील चौपदरीकरण सुरू केले होते; मात्र अजूनही ते काम पूर्ण झाले नाही. तसेच जेजुरी औद्योगिक वसाहतीच्या पुढील रस्ता जेजुरी खिंड ते नीरा या रस्ताचे रुंदीकरण अद्यापपर्यंत केले गेले नाही. काही ठिकाणी तर दोन गाड्या रस्त्यावरही बसत नसल्याने या रस्त्यावर अनेक अपघात होत असतात. या महामार्गावरून सातारा, कोल्हापूर, सांगली, बंगलोर आदी अनेक मोठ्या रस्त्यांना जोडणारा हा रस्ता असल्याने अनेक अवजड वाहने या मार्गावरुन ये जा करत असतात. तसेच या मार्गाने अनेक तीर्थक्षेञांना जाता येते. यामध्ये, जेजुरी, मोरगाव, आळंदी, देहू, पंढरपूर, शिखर शिंगणापूर आदी मोठ्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा महामार्ग आहे. तसेच जेजुरी, नीरा, लोणंद या ठिकाणावरील औद्योगिक वसाहतीमध्ये दररोज अनेक महिला तसेच पुरुष कामगार याच रस्त्याने जात असतात. या महामार्गावरील सध्याची वाहतूक परिस्थिती पाहिली तर या मार्गावरील पडलेले खड्डे तसेच अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असलेली साईडपट्टी भरून घेणे आवश्यक आहे.
काही दिवसा पासून या महामार्गा वरिल खड्डे बूजावण्याचे काम चालू आहे.मात्र ठेकेदाराने काही कारनस्थव ते काम मध्येच थांबवले आहे.पण राहिलेले काम लवकरात लवकर चालू करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
श्रुती नाईक.सहायक अभियंता श्रेणी 1 रास्ट्रीय महामार्ग विभाग पुणे .