मनपा बसस्टाॅप्सची बदलली जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 04:27 PM2018-06-19T16:27:52+5:302018-06-19T16:27:52+5:30
पुणे महानगरपालिकेच्या विस्तारीत इमारतीचे बांधकाम पूर्ण हाेत अाले अाहे. या इमारतीच्या प्रवेशद्वारासमाेरच पीएमपीचे काही बसस्टाॅप्स येत असल्याने त्यांचे स्थलांतर करण्यात येत अाहे.
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या विस्तारित इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार अाणि पीएपीचे मनपा बसस्थानक एकाच ठिकाणी अाल्याने मनपा बसस्टाॅपची जागा बदलण्यात अाली अाहे. पालिकेच्या शेजारी असलेल्या टपले गॅरेजच्या जागेत काही नवीन बसस्टाॅप हलविण्यात अाले अाहेत.
पालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीचे काम पूर्ण हाेत अाले अाहे. या इमारतीचे उद्घाटन लवकरच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात येणार अाहे. पालिकेच्या नवीन इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमाेेर पीएपीच्या अाळंदी-विश्रांतवाडी, धानाेरी, मुंजाबावस्ती, चिंचवड, भाेसरी, निगडी परिसराच्या बसस्टाॅपचे स्थलांतर करावे लागणार अाहे. पहिल्या टप्प्यात अाळंदी, विश्रांतवाडी, देहूगाव या तीन बसस्टापचे स्थलांतर करण्यात अाले अाहे. बसस्टाॅप स्थलांतर करण्यात अालेली जागा ही महापालिकेच्याच मालकीचे अाहेत. त्याचबराेबर जुन्या बसस्टाॅप्सजवळच ही असल्याने प्रवाश्यांसाठी साेयीचे जाणार अाहे.
पुणे महानगरपालिकेच्या विस्तारित इमारतीचे काम पूर्ण हाेत अाले अाहे. या इमारतीचे मुख्यद्वार हे पीएमपी बसस्थाकांच्या येथे येत असल्याने ही बसस्थानके हलविण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. पालिकेत येणाऱ्या वाहनांमुळे तसेच येथे उभ्या असलेल्या बसेसमुळे वाहतूक काेंडीची समस्या निर्माण हाेऊ शकते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात अाला अाहे.