प्राधान्यक्रमासह हवा विकास आराखडा

By admin | Published: December 23, 2016 12:27 AM2016-12-23T00:27:40+5:302016-12-23T00:27:40+5:30

सर्वांगीण विकास साधत लोणावळा शहराला जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ बनविण्यासाठी शहरातील अनेक पायाभूत सुविधा व पर्यटन

Plan for air development with priority | प्राधान्यक्रमासह हवा विकास आराखडा

प्राधान्यक्रमासह हवा विकास आराखडा

Next

लोणावळा : सर्वांगीण विकास साधत लोणावळा शहराला जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ बनविण्यासाठी शहरातील अनेक पायाभूत सुविधा व पर्यटन विकासाच्या धूळ खात पडलेल्या प्रकल्पांना गती देण्याची गरज आहे. हे महत्त्वाचे प्रकल्प विकास आराखडा तयार करीत क्रमवारीने पूर्ण केल्यास शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो.
हे सर्वच प्रकल्प जादूची कांडी फिरविल्यासारखे एका दिवसात पूर्ण होणार नाहीत. मात्र, त्यामध्ये विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरविल्यास कोणती कामे पहिल्या टप्प्यात करायची, कोणती दुसऱ्या टप्प्यात करायची याचे योग्य नियोजन झाल्यास ते मार्गी लागू शकतील. मूलभूत व पायाभूत समस्या सोडविण्याबरोबरच काही पर्यटन विकासाचे महत्त्वाचे प्रकल्पदेखील पंचवार्षिक काळात पूर्ण करता येऊ शकतात. याकरिता पाच वर्षांत कोणती कामे प्राधान्यक्रमाने करायची याचा विकास आराखडा लोणावळा नगर परिषदेने तयार करण्याची गरज आहे.
शहरात वाहतूककोंडी व कचरा या दोन्ही समस्या जटिल आहेत. त्या दोन्ही कामांना प्राधन्य देण्याची गरज असून, वाहतूककोंडी सोडविण्यासाठी रस्ते रुंदीकरण, वाहनतळ, अतिक्रमण हटविणे, पर्यायी रस्ते खुले करणे यासोबत भांगरवाडी येथील उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावणे गरजेचे आहे. कचरा समस्या सोडविण्यासाठी शहरातील कचराकुंड्यांमधील, तसेच घरोघरचा कचरा गोळा करून तो वरसोली येथील कचरा डेपोवर टाकण्याचे महत्त्वाचे काम विनाअडचण करणे गरजेचे आहे.
इंद्रायणी नदी उगमस्थानाचे सुशोभीकरण करून पात्राची सुधारणा आवश्यक आहे. उद्यानांची दुरुस्ती करून त्यामध्ये लेजर शो, सायन्स पार्कची उभारणी करणे, भुयारी गटर योजना नव्याने राबवत बंद असलेले मलशुद्धीकरण केंद्र सुरू करणे, भाजी मार्केटची इमारत स्वबळावर उभी करत खाली दोन मजली पार्किंग उभारणे, नगर परिषद मिळकतींचा रखडलेला लीजचा प्रश्न, क्रीडास्कूल, कुणेनामा येथील रोप वेलगतच्या जागेवर बग्गी जम्पिंग साहसी खेळ प्रकार सुरू करणे, खंडाळा तलाव सुशोभीकरण व नौकाविहाराचे वर्षभरापासून अर्धवट राहिलेले काम पुन्हा सुरु करून ते पर्यटकांसाठी खुले करणे, २४ तास मुबलक व शुद्ध पिण्याचे पाणी देण्याच्या प्रकल्प कामास सुरुवात करून सध्या बंद असलेला जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करणे, वलवणमधील तलावाचे सुशोभीकरण करून नौकाविहार केंद्र सुरू करणे, तुंगार्ली धरणाचे मजबुतीकरण व सुशोभीकरण करणे, पर्यटन सहायता कक्ष उभारणे
याचा प्राधान्यक्रम ठरवून तसा विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)

Web Title: Plan for air development with priority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.