शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्याचा प्लॅन, त्या दोघांना पिस्तुलासह अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 17:53 IST2025-01-03T17:30:58+5:302025-01-03T17:53:34+5:30

गँगस्टर शरद मोहोळचा (दि. ५ जानेवारी) भरदुपारी त्याच्या सुतारदरा येथील घरासमोर गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.

Plan to avenge the murder of Sharad Mohol, the two were arrested with a pistol | शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्याचा प्लॅन, त्या दोघांना पिस्तुलासह अटक

शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्याचा प्लॅन, त्या दोघांना पिस्तुलासह अटक

- किरण शिंदे

पुणे - कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा ५ जानेवारी २०२४ रोजी गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. कोथरूड येथील सुतारदरा भागात शरद मोहोळ याच्या घराजवळच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेला उद्या एक वर्षाचा कालावधी पूर्ण होईल. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ याच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना अटक केली आहे.

शरद मालपोटे आणि संदेश कडू अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांच्या ताब्यातून दोन पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली. दोघांना अटक केली असली तरीही यात आणखी काही जणांचा समावेश आहे. आणि लवकरच त्यांनाही अटक केली जाईल अशी ही माहिती समोर आली आहे. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दोघांनीही शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्याची पूर्ण तयारी केली होती. त्यासाठी या दोघांनी पिस्तूल हे आणले होते. आणि हे दोघेही संधीच्या शोधात होते. मात्र त्यापूर्वीच गुन्हे शाखेच्या पोलिसांना त्यांच्या या कटाचा सुगावा लागला आणि त्यांनी या दोघांना सापळा नाटक केली. या संपूर्ण कटात आणखीही काही आरोपी असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पुणे पोलीस आता तपास करत आहेत. या आरोपींच्या निशाण्यावर कोण होते? त्याच्या या कटात आणखी कोण सहभागी आहे? याचा तपास आता पुणे पोलीस करत आहेत. 

गँगस्टर शरद मोहोळचा (दि. ५ जानेवारी) भरदुपारी त्याच्या सुतारदरा येथील घरासमोर गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. शरद मोहन सोबत सतत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता. शरद मोहोळ याच्यावर ३ जणांनी गोळ्या झाडल्या होत्या. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होता. तपासा दरम्यान या गुन्ह्यात १७ आरोपी निष्पन्न झाले. मुळशीतील विठ्ठल शेलार टोळी या खुनामागे असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर गुंड विठ्ठल शेलारसह १७ जनांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Plan to avenge the murder of Sharad Mohol, the two were arrested with a pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.