'योजना सुरुच राहणार, माझ्या लाडक्या बहीणी विरोधकांना जागा दाखवतील'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 08:31 PM2024-08-17T20:31:32+5:302024-08-17T20:34:37+5:30

CM Eknath Shinde : आज पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यस्तरीय लाभ वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

plan will go ahead, my dear sister will show the opposition a place Chief Minister Eknath Shinde criticized | 'योजना सुरुच राहणार, माझ्या लाडक्या बहीणी विरोधकांना जागा दाखवतील'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

'योजना सुरुच राहणार, माझ्या लाडक्या बहीणी विरोधकांना जागा दाखवतील'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

CM Eknath Shinde ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' सुरू केली आहे. या योजनेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. विरोधकांनी महायुती सरकारविरोधात आरोप सुरू केले आहेत. आज पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यस्तरीय लाभ वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते, यावेळी पत्रकारांसोबत संवाद साधत असताना विरोधकांवर निशाणा साधला. 

"महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उद्धव ठाकरेच"; मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना राऊतांचे मोठं विधान

"आज माझ्या लाडक्या बहीणींसाठी आनंदाचा दिवस आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बहीणींच्या खात्यात पैसे जमा झाले. दीड कोटीपेक्षा बहीणींच्या खात्यावर पैसे जमा झाले. हे एक मुख्यमंत्री म्हणून मला आनंद आहे. सर्वसामान्यांच्या खात्यावर पैसे जाणे म्हणजे अभिमानाची बाब आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले."सगळ्या अडचणी उत्पन्न करण्याचे काम विरोधकांनी केले. एखादी योजना आणायची असेल तर त्यासाठी खूप काम करावं लागतं. यासाठी आम्ही काम केलं आहे. या योजनांमुळे विरोधक बिथरले आहेत, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.  

'आम्ही जे बोलतो ते करतो, आम्ही रक्षाबंधनाच्या आधी पैसे जमा करणार हे सांगितलं होतं. आता पैसे जमा होत आहेत. आम्ही बहीणींना शब्द दिला होता तो आता पूर्ण झाला आहे. विरोधक या योजनेला बदनाम करत होते, विरोधक असं म्हणत होते की, हे विकत घेत आहे का? लाच देत आहे का? असे उद्गार विरोधकांनी काढले मी काही बोलत नाही, मी आरोपाला कामातून उत्तर देतो.माझ्या लाडक्या बहीणी योग्य ते उत्तर देतील, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

विरोधक कोर्टातही गेले

"विरोधक एवढ्यावर थांबले नाहीत, ते कार्टातही गेले. कोर्टानेही त्यांना फटकारले आणि माझ्या लाडक्या बहीणींच्या बाजूने न्याय दिला. यामुळे कितीही त्यांनी कितीही काही केले तरी योजना थांबणार नाही. या योजनेचे सर्व नियोजन आम्ही केले आहे. आम्ही ३३ हजार कोटी रुपयांचे नियोजन केले आहे.  आम्ही भविष्यात यात रक्कम वाढवू, तीन हजार करु, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. विरोधक आजचा कार्यक्रम बघून आता बिथरले आहेत, हे सरकार देणारं आहे, घेणारे नाही, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

Web Title: plan will go ahead, my dear sister will show the opposition a place Chief Minister Eknath Shinde criticized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.