पंचायत समितीचे नियोजित काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:11 AM2021-03-14T04:11:22+5:302021-03-14T04:11:22+5:30

खेड तालुक्यातील पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे काम व जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये टोकाचे मतभेद आहेत. जिल्हा परिषदेच्या नुकत्याच ...

Planned work of Panchayat Samiti | पंचायत समितीचे नियोजित काम

पंचायत समितीचे नियोजित काम

Next

खेड तालुक्यातील पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे काम व जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये टोकाचे मतभेद आहेत. जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या जागेचा पूर्वीचा ठराव बहुमताने रद्द करण्यात आला. ही माहिती मिळाल्यानंतर, या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेड पंचायत समिती सभागृहात शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रवादी नेत्यांवर टीका करताना ते म्हणाले की, खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते तालुक्याचे हुकूमशहा आहेत तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे या त्यांच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या बाहुल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कामकाज आमदारांच्या मर्जीप्रमाणे होत आहे. माजी आमदार स्व. गोरे यांनी इमारतीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी आणून इमारत होण्यासाठी मंत्रालय पातळीपर्यंत कोरोना काळात प्रयत्न केले. त्यातच संसर्ग होऊन त्यांना जीव गमवावा लागला. त्यानंतर स्थानिक शिवसेनेकडून या जागेत इमारत होण्यासाठी अस्मितेचा प्रश्न निर्माण केला गेला. गेल्या आठ दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत बहुमताच्या जोरावर या जागेचा प्रस्ताव रद्द करण्यात आला.

खेड पंचायत समितीची नवीन पाच कोटी रुपयांची इमारत, सध्याच्या पंचायत समितीसमोर मंजूर आहे. माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांनी इमारत मंजूर करून घेऊन, ठेकेदार नेमत भूमिपूजनही केले होते. मात्र, आमदार मोहिते हे या कामाला खोडा घालतात असल्याचेही त्यांनी सांगितले.

या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, जिल्हा परिषद सदस्य देवीदास दरेकर, राहुल गोरे, नितीन गोरे, विजयसिंह मोहिते पाटील, पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, तनुजा घनवट, अशोक खांडेभराड, शिवाजी वरपे, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, महिला प्रमुख नंदा कड, सुरेश चव्हाण, ज्योती आरगडे, अमर कांबळे, रविंद्र करंजखेले, मारुती सातकर, एल. बी. तनपुरे, सरपंच किरण गवारे, भरत थिगळे आदी उपस्थित होते.

---

फोटो क्रमांक: १३

फोटो ओळ: राजगुरुनगर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदे बोलताना शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील..

Web Title: Planned work of Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.