शालेय साहित्य वाटपाचे नियोजन फसले
By admin | Published: June 15, 2015 06:06 AM2015-06-15T06:06:12+5:302015-06-15T06:06:12+5:30
महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने पहिल्याच दिवशी शालेय साहित्य वाटप करण्याचे नियोजन फसले आहे. महापालिका शाळेतील
Next
पिंपरी : महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने पहिल्याच दिवशी शालेय साहित्य वाटप करण्याचे नियोजन फसले आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी फक्त पुस्तक, गणवेश दिले जाणार आहेत. बूट आणि रेनकोट, वह्यांसाठी महिनाभराचा कालावधी लागेल, असे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळा असून, विद्यार्थ्यांना आजवर कधीही शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय साहित्याचे वाटप केले गेले नाही. दफ्तर दिरंगाई होते. सदस्य, अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात समन्वय नसल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. टक्केवारीतच सदस्यांना अधिक रस राहिल्याने शिक्षण मंडळ नेहमीच चर्चेत असते.