तिसरी लाट गृहीत धरून नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:06 AM2021-05-03T04:06:13+5:302021-05-03T04:06:13+5:30

तिसरी लाट गृहीत धरून नियोजन करा : उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती : बारामती तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. ...

Planning assuming a third wave | तिसरी लाट गृहीत धरून नियोजन

तिसरी लाट गृहीत धरून नियोजन

Next

तिसरी लाट गृहीत धरून नियोजन

करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती : बारामती तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून आतापासूनच काटेकोर नियोजन करा. ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन बारामतीत ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा, रेमडेसिविर इंजेक्शनचे योग्य प्रकारे नियोजन करा. बारामती तालुक्यातील सुपे येथे कोविड सेंटर उभारण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, तालुक्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर यांबाबतचे नियोजन करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -१९ विषाणू प्रादुभार्वाच्या परिस्थितीची आढावा बैठक रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची माहिती वरिष्ठ वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. पवार म्हणाले की, शासनाने प्रशासनास कडक निर्बंध लावण्याबाबतचे पूर्ण अधिकार दिले आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. आवश्यक त्या आरोग्य सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी मनुष्यबळ कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी. लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर देण्याबाबत सांगितले. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने काळजी घेणे गरजेचे आहे. सामाजिक अंतर ठेवणे, हात वारंवार धुणे, गर्दी टाळणे या त्रिसूत्रीवर भर द्यावा तसेच नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी आवाहन केले.

या वेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती शहरासह तालुक्यातील कोरोनाची सद्य:स्थिती व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबतची माहिती दिली. या वेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता फरांदे, जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम सभापती प्रमोद काकडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसीलदार विजय पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, माजी जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

-----------------

उपमुख्यमंत्री पवार यांनी केलेल्या सूचना...

- कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून आतापासूनच काटेकोर नियोजन करा.

- ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन बारामतीत ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा

- रेमडेसिविर इंजेक्शनचे योग्य प्रकारे नियोजन करा

- सुपे येथे कोविड सेंटर उभारण्यासाठी तत्काळ कार्यवाही करा

Web Title: Planning assuming a third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.