खोट्या झाडांपेक्षा ऑक्सिजन देणारी खरी झाडे लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:13 AM2021-03-26T04:13:00+5:302021-03-26T04:13:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे अपेक्षित आहे. मात्र पुणे महापालिकेकडून वृक्षलागवड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे अपेक्षित आहे. मात्र पुणे महापालिकेकडून वृक्षलागवड करण्याऐवजी खोटी ‘बोलकी’ झाडे लावली जात आहेत. कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती खालावली असताना, लाखो रुपयांची खोटी झाडे लावण्यापेक्षा ऑक्सिजन देणारी खरी झाडे लावा, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.
पुणे महापालिकेकडे महावितरणची थकबाकी भरण्यास पैसे नाहीत. पण कोथरूड येथील एका उद्यानात ८८ लाख रूपये खर्च करून झाडे बसवण्याचा घाट घातला जात आहे. कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती खालावल्याने शहरातील अनेक विकासकामे थांबविली आहेत. उपनगरांमध्ये पाणी, ड्रेनेज, रस्ते, विद्युत व इतर पायाभूत सेवासुविधा नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत असून, तरीही हे नागरिक महापालिकेचा मिळकतकर पूर्णपणे भरतात. पुणेकरांनी मनपाच्या तिजोरीत मिळकतकराच्या माध्यमातून कोट्यवधींचा भरणा कोरोनाकाळात उत्पन्न घटल्यावरही केला. पण याचा गैरफायदा सत्ताधारी पक्षाच्या दबावाने प्रशासनाकडून होत आहे, असा आरोपही धुमाळ यांनी केला.
--------------------------------------